सार्वजनिक शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती आणि शहरातील सर्व परिसरातील तमाम शिवभक्तांनकडुन छत्रपती शिवाजी महाराज जन्म सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला , सार्वजनिक शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिषेक पुजन करून दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकल मराठा समाजाच्या वतीने महाराजांचे पुजन करून आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करून जयंती साजरी करण्यात आली. ऑल इंडिया एस.सी.एस.टी.असो. आणि सी. आर.एम.एस. असो. च्या वतीने रेल्वे कारखाना येथे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले. बी.पी.सी.एल. मालक , चालक , वाहक मित्र मंडळाच्या वतीने पानेवाडी येथे श्री प्रशांत कुलकर्णी सर यांचे शिवचरित्र व्याख्यान , रक्तदान शिबिर आणि मोटार सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते . युवा सत्ता मंचच्या वतीने दत्त मंदिर पासून ते छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत मशाल यात्रा काढण्यात आली. शहरातील सर्व प्रमुख पक्ष आणि पदाधिकारी यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले.
संस्कृती संवर्धन समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.मनमाड बचाव कृती समितीच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले अभ्यासिका येथे महाराजांना अभिवादन करण्यात आले. बुधलवाडी येथे गणेशभाऊ धात्रक मित्र मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. मनमाड येथील प्रसिद्ध कलाकार श्री साहिल साळसकर यांनी मेहेंदी पासुन महाराजांचे चित्र काढुन आपल्या कलेच्या माध्यमातून महाराजांना अभिवादन केले. शहरातील महात्मा फुले चौक येथील बाल शिवभक्तांनी महाराजांची वाद्य आणि महाराजांच्या नावाचा जयजयकार करत मिरवणुक काढुन मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली.















