मनमाड नगर परिषदेच्या शिवजयंती उत्सव समिती तर्फे नगरपरिषदेजवळ शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.मुख्याधिकारी सचिन पटेल यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. नगरपरिषदेचे कर्मचारी किशोर व्यवहारे यांची कन्या आकांक्षा हिने वेटलिफ्टींग मध्ये ४० किलो वजनी गटात नॅशनल लेव्हल ला सुवर्णपदक पटकावले तसेच राजेंद्र त्र्यंबक जाधव यांचा मुलगा सैन्य दलात आहे.प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने किशोर व्यवहारे आणि राजेंद्र जाधव यांच्या हस्ते सपत्नीक शिवपूजन व महाआरती करण्यात आली. नगर परिषदेचे कर्मचारी आणि शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अंगणवाडीत केले जात आहे पाककला स्पर्धेचे आयोजन महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद- सुज्ञा खरे बाविसेयो प्रकल्प नागरी नाशिक -२
एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प (नागरी)नाशिक २ अंतर्गत अंगणवाडी केंद्र क्रमांक १० मोरवाडी गाव...










