मनमाड : येथील बुधलवाडी येथील महादेव मंदिर येथे महाशिवरात्री निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षी देखील विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन या हरिनाम सप्ताहात करण्यात आले आहे , दिनांक 23-02-2022 ते 02-03-2022 पर्यंत पहाटे 5 ते 7 काकड भजन , सकाळी 8 ते 10 आणि दुपारी 2 ते 4 पर्यंत ज्ञानेश्वरी पारायण , सायंकाळी 7 ते 8 हरिपाठ आणि रात्री 9 ते 11 महाराष्ट्रातील प्रसिद्ध किर्तनकारांच्या हरिनाम किर्तनाचे आयोजन करण्यात आले आले आहे.या हरिनाम सोहळ्याचा शहरातील आणि परिसरातील भाविकांनी लाभ घ्यावा असे आव्हान हरिनाम सप्ताहाच्या आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.











