प्रतिनिधी-मराठा विद्या प्रसारक समाजाचे जनता विद्यालय निमोण तालुका चांदवड येथील कलाशिक्षक श्री सचिन पाटील यांना कसमादे गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. सचिन पाटील यांना उपक्रमशील शिक्षक पुरस्काराने मानचिन्ह देऊन माजी आमदार माजी आमदार सौ. दीपिका चव्हाण यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला. याबद्दल संस्थेच्या सरचिटणीस नीलिमाताई पवार, तालुका संचालक श्री. उत्तम बाबा भालेराव, स्कुल कमिती अध्यक्ष मा. रतनजी दखणे, विद्यालयाचे प्राचार्य श्री सूर्यवंशी पी. व्ही व विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू-भगिनी यांनी त्यांचे कौतुक केले व त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
श्री स्वामी समर्थ केंद्र आयोजित दरवर्षी होणारा कृषी महोत्सव शेतकरी बांधवांसाठी स्तुत्य उपक्रम :- डॉ भारती पवार
श्री स्वामी समर्थ केंद्राचे प्रमुख गुरूमाऊली यांच्या पुढाकाराने नाशिक येथे आयोजित जागतिक कृषी...









