Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा स्मृतिदिन भावपूर्ण वातावरणात साजरा

Mar 11, 2022


दिनांक 10/03/ 2022 रोजी म. गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे सावित्रीबाई फुले यांचा स्मृतिदिन भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अरुण पाटील होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकला तसेच सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच स्रीयांना आजचे स्थान प्राप्त झाले. सावित्रीबाई ज्योतिराव फुले भारतीय समाजसुधारक आणि कवी होत्या. पती ज्योतिराव फुले यांच्यासमवेत त्यांनी भारतातील महिलांचे हक्क वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण काम केले आहे. 1848 मध्ये त्यांनी पुण्यात देशातील पहिली महिला शाळा स्थापन केली. सावित्रीबाई फुले जातीभेद, वर्णभेद आणि लैंगिकतेला तीव्र विरोध दर्शवत होत्या. असे मनोगत व्यक्त केले याप्रसंगी वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. पी.जी. आंबेकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य श्रीमती ज्योती पालवे महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

विद्यार्थ्यांची सुरक्षा वेशीवर – दे धक्का स्कूल वाहनाने विद्यार्थ्यांना  पोहचवले जात आहे शाळेत….  वाहतूक पोलिस लक्ष देतील काय?

विद्यार्थ्यांची सुरक्षा वेशीवर – दे धक्का स्कूल वाहनाने विद्यार्थ्यांना पोहचवले जात आहे शाळेत…. वाहतूक पोलिस लक्ष देतील काय?

नांदगाव : हम चले स्कूल पण स्कूल बस धक्कास्टार्ट असल्याने पोखरी घाटात बंद पडलेल्या स्कूल बसला धक्का...

read more
अंकाई टँकाई किल्ल्याजवळ शेतात आढळले भुयार – चर्चांना उधाण – पुरातत्व विभाग करणार प्रत्यक्ष पाहणी

अंकाई टँकाई किल्ल्याजवळ शेतात आढळले भुयार – चर्चांना उधाण – पुरातत्व विभाग करणार प्रत्यक्ष पाहणी

मनमाड शहरापासून जवळच असलेल्या अनकवाडे शिवारात युवराज धिवर यांच्या शेतात नांगरणी सुरु असताना...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]