loader image

अंकाई टँकाई किल्ल्याजवळ शेतात आढळले भुयार – चर्चांना उधाण – पुरातत्व विभाग करणार प्रत्यक्ष पाहणी

Dec 30, 2023


मनमाड शहरापासून जवळच असलेल्या अनकवाडे शिवारात युवराज धिवर यांच्या शेतात नांगरणी सुरु असताना नांगराचा फाळ अडकल्याने तेथे मोठे भगदाड असल्याचे निदर्शनास आले. हा प्रकार नेमका काय आहे? याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

ह्या भगदाडाखाली भुयार अथवा धान्य अथवा किमती वस्तू साठविण्यासाठी गुदाम असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भुयारी
मार्ग सापडल्याची माहिती वाऱ्या सारखी परिसरात पसरताच बघ्यांची मोठी गर्दी उसळली होती.

दरम्यान, भुयाराबाबत पुरातत्त्व विभागाला कळविण्यात आले असून पुरातत्त्व विभागाच्या पाहणीनंतर त्याचे गूढ उकलणार जाणार आहे.

अनकवाडे शिवारातील शेतात मोठे भगदाड आढळून आल्याने खळबळ उडाली. हा प्रकार नेमका काय आहे? याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. तलाठी प्रतिभा नागलवाड यांनी घटनास्थळी
जाऊन पंचनामा केला. तसेच वरिष्ठ कार्यालय आणि पुरातत्त्व विभागाला यासंबंधी माहिती दिली. आता पुरातत्त्व विभागाचे अधिकारी येऊन प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर हे भगदाड नेमके काय आणि कसले आहे, याचा उलगडा होईल.

दरम्यान, येथून जवळ अंकाई- टंकाई हे ऐतिहासिक किल्ले आहेत. या किल्ल्यावर जाण्यासाठी पूर्वीच्या काळी अशा प्रकारे रस्ता बनविलेला असावा, असाही अंदाज व्यक्त केला जात आहे.


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
.