Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

चांदवड तंत्रनिकेतन येथे पालक व शिक्षक मेळावा संपन्न

Mar 14, 2022

चांदवड येथील श्री नेमीनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संचलित श्री.एच.एच.जे.बी. तंत्रनिकेतन अंतर्गत मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाद्वारे पालक व शिक्षक मेळावा दि. ११/०३/२०२२ रोजी आयोजित करण्यात आला. शिक्षक-पालक नाते, पालक आणि शिक्षक यांच्यातील विश्वास आणि परस्पर समज हे मुलाच्या आनंदी शिक्षणाचे खरे रहस्य आहे. शिक्षकांप्रती पालकांचा पाठिंबा आणि सहकार्य मुलाशी जोडण्यास, समजून घेण्यास आणि कार्य करण्यास खूप मदत करते. पालक आणि शिक्षक यांनी समजून घेऊन काम केल्यास मुलांमध्ये लक्षणीय सकारात्मक बदल दिसून येतो. नमुद बाबी लक्षात घेऊन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या मेळाव्या दरम्यान प्रास्ताविक श्री बाफना सर यांनी मांडले. विभाग प्रमुख श्री डी.व्ही. लोहार व डॉ. जी. डी .शिंदे सर यांनी पालकांनी त्यांची भूमिका कशी व्यवस्थित रित्या पार पडावी. तसेच विद्यार्थ्यांनी प्रॅक्टिकल ज्ञान वाढविण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करण्याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी श्री भावसार सर यांनी महाविद्यालय, विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करून कौशल्य वाढविण्यासाठी कटिबद्ध आहे , असे आश्वासन देऊन आभार व्यक्‍त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री पगार सर व श्री पारखे सर यांनी केले. तसेच श्री वाघ सर , श्री खैरनार सर, श्री सदावर्ते सर यांचे मोलाचे साह्य लाभले.तंत्रनिकेतनाचे प्राचार्य डॉ. व्ही.ए. वानखेडे, उपप्राचार्य श्री.एस.एच. गौडा व मेकॅनिकल विभागाचे विभाग प्रमुख श्री. डी.व्ही. लोहार यांच्‍या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.
विश्वस्त समितीचे अध्यक्ष मा.श्री बेबीलालजी संचेती व विश्वस्त समितीचे उपाध्यक्ष मा.श्री. दिनेशजी लोढा, मानद सचिव मा.श्री. जवाहरलालजी आबड, प्रबंध समितीचे अध्यक्ष मा.श्री. अजीतकुमारजी सुराणा, प्रबंध समितीचे उपाध्यक्ष आणि तंत्रनिकेतनाचे समन्वयक मा.श्री. अरविंदकुमारजी भन्साळी, सह मानद सचिव मा.श्री. झुंबरलालजी भंडारी, व तंत्रनिकेतनाचे मुख्य समन्वयक तथा प्रबंध समिती सदस्य मा.श्री. राजेंद्रकुमारजी बंब यांनी या आयोजनाबद्दल संबंधितांचे अभिनंदन केले .

अजून बातम्या वाचा..

जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, चांदवड व निफाडसह राज्यातील 19 तालुक्यात पिकांचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश

जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, चांदवड व निफाडसह राज्यातील 19 तालुक्यात पिकांचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, आणखी १९ तालुक्यांमध्ये #दुष्काळ जाहीर...

read more
रोजगार महाकुंभ’ भव्य रोजगार मेळावा उत्साहात संपन्न. ११ कंपन्यांचा सहभाग; 236 पेक्षा जास्त युवकांचे रजिस्ट्रेशन आणि जवळपास 162 युवकांची अंतरिम निवड

रोजगार महाकुंभ’ भव्य रोजगार मेळावा उत्साहात संपन्न. ११ कंपन्यांचा सहभाग; 236 पेक्षा जास्त युवकांचे रजिस्ट्रेशन आणि जवळपास 162 युवकांची अंतरिम निवड

नाशिकच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला,...

read more
चांदवड तालुक्याचा ट्रिगर-1 मध्ये समावेश करावा – आमदार आहेर यांची मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांकडे मागणी

चांदवड तालुक्याचा ट्रिगर-1 मध्ये समावेश करावा – आमदार आहेर यांची मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांकडे मागणी

राज्यातील २६८ तालुक्यांमध्ये खरीप हंगामासाठी ‘ट्रिगर-१’ लागू करून दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]