loader image
[ays_poll id=7]

अन्ननलिकेत सुपारीचा तुकडा अडकुन ३७ वर्षीय इसमाचा मृत्यू

Mar 15, 2022

 गुटखा खाणाऱ्यांना सतर्क बातमी औरंगाबाद मध्ये समोर आली आहे. टीव्हीचे डिश फिट करण्यापूर्वी तोंडात गुटखा टाकून कामाला सुरवात करताच अचानक ठसका लागला. त्यातच सुपारीचा तुकडा घशातुन अन्ननलिकेत जावुन अडकून बेशुध्द झालेल्या 37वर्षीय व्यक्तीचा म्रुत्यु झाला.गुरुवारी दि. १० मार्चला रात्री उस्मानपुरा भागात ही घटना घडली.डॉक्टरांच्या शवविच्छेदन अहवालातुन ही बाब स्पष्ट झाली आहे. गणेश जगन्नाथ दास (३७,रा.पद्मपाणी, रेल्वे स्टेशन) असे म्रुताचे नाव आहे. ते वीस वर्षापासून खाजगी कंपनीत कामाला होते. त्यांच्या पश्चात आई,पत्नी, दोन मुले,भाऊ असा परिवार आहे. पोलिसांकडुन मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री गणेश हे कंपनी मालकाच्या घरी टीव्हीचे डिश बसविण्यासाठी गेले होते. डिश फिट करण्याचे काम सुरू करण्यापुर्वी त्यांनी गुटखा तोंडात टाकला.त्यांना अचानक ठसका लागला. अचानक गंभीर ठसका लागल्याने तोंडातील गुटख्यामध्ये असलेल्या एक सुपारीचा तुकडा घशात जावुन अन्ननलिकेत अडकला ते जागेवरच बेशुद्ध पडले.त्यांना तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासून त्यांना म्रुत घोषित केले.
शुक्रवारी त्यांचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला.जोराचा ठसका लागल्याने तोंडातील सुपारीचा तुकडा घशातून जाऊन अन्ननलिकेत अडकला ,यातच त्यांचा म्रुत्यु झाला. असे त्यात म्हटले आहे. य प्रकरणी उस्मानपुरा ठाण्यात अकस्मात म्रुत्यु ची नोंद करण्यात आली आहे.

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर मंडलाच्या वतीने स्वतंत्र हिंदुस्थान च्या 79 व्या स्वातंत्र्य दिना...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला....

read more
नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

मनमाड -- नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात...

read more
फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन - श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा ! फलक रेखाटन...

read more
मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड - 79 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्ये ला 14 ऑगस्ट या अखंड भारत दिना निमित्ताने...

read more
.