Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

आशा सेविकांचे कार्य कौतुकास्पद : सौ.अंजुम कांदे

Mar 16, 2022

महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा, पंचायत समिती नांदगाव, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आशा गुणगौरव सोहळा नांदगाव येथे संपन्न झाला.

या कार्यक्रमाचं अध्यक्षपद सौ.अंजुम सुहास कांदे यांनी भूषावलं.
गेल्या दोन वर्षांपासून कोरोणाच्या महामारी नंतर पहिल्यांदाच नांदगाव तालुक्यातील सर्व आशा सेविका गुणगौरव सोहळ्याच्या निमित्ताने एकत्र आल्या होत्या.

एक डिसेंबर रोजी आशा डे साजरा केला जातो पण तो कोरोणाच्या वातावरणात झाला नाही म्हणून आज आशा गुणगौरव सोहळ्याच्या निमित्ताने आशा डे साजरा करण्यात आला.
याप्रसंगी अनेक आशा सेविका यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कोरोना काळात घरोघर जाऊन रुग्णांची सेवा असो किंवा आजही आपापल्या क्षेत्रात अगदी गरोदर महिलेच्या बाळंतपणा पर्यंत तिला मदत करणे असो आशा वर्कर हा आरोग्यसेवे च्या भक्कम पाया आहे आणि हे काम दुसरं कोणी करू शकत नाही म्हणूनच आशा हे आरोग्यसेवे चं भक्कम असं मूळ आहे असे विचार तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष जगताप यांनी व्यक्त केले
सौ अंजुम सुहास कांदे यांनी आपल्या मनोगतात आशा सेविकांचे कौतुक केले. आशा सेविकांनी आपलं कुटुंब सांभाळत संपूर्ण समाजाची सेवा केली न घाबरता कोविड काळात घरा घरात पर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्याची महान कार्य केले म्हणूनच आशा सेविकांचं कौतुक करावं तितकं कमी आहे, तुम्हाला आशा सेविका नाही तर अशा कुटुंब म्हणावं असं मला वाटतं कारण आपण सर्व आशा भगिनी एका कुटुंबाप्रमाणे राहतात आणि संपूर्ण समाजाला आपण आरोग्य सेवा पुरवत असतात म्हणून आपणास आशा कुटुंब म्हणायला मला आवडेल असे त्या याप्रसंगी म्हणाल्या.
आमदार सुहास अण्णा कांदे आणि आमच्या कुटुंबीयांकडून आपणास कोणत्याही क्षणी काही अडचण असल्यास संपर्क करा नक्कीच आपली मदत केली जाईल असा विश्वासही यावेळी त्यांनी दिला.
आशा सेविका सतत समाजाच्या सेवेत कार्य करत असतात,सोबत स्वतः चं कुटुंब सांभाळतात,स्वतः साठी वेळ काढता येत नाही,आणि म्हणून यापुढे दर वर्षी सर्व आशा ताईंसाठीसाठी एक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्याची घोषणा यावेळी सौ अंजुम सुहास कांदे यांनी केली.
याप्रसंगी अशा सेविका साठी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या यात सांस्कृतिक कार्यक्रम व रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले होते. सौ अंजुम सुहास कांदे यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
या प्रसंगी शिवसेना महिला आघाडी उप जिल्हा प्रमुख संगीता बागुल,नांदगाव तालुका प्रमुख विद्या जगताप,नांदगाव शहर प्रमुख रोहिणी मोरे तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संतोष जगताप, आरोग्य विस्तार अधिकारी चंद्रेश्वर तुपे व अमोल कठाळे,लेखाधिकारी आनंद घुगे,सहाय्यक किशोर ढेकळे, कुष्ठरोग सहाय्यक निलेश आहेर, संबंधित तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर्स, सर्व आशा सेविका उपस्थित होत्या

अजून बातम्या वाचा..

राष्ट्रीय पोषण महा १ ते ३० सप्टेंबर २०२३ मध्ये अंगणवाडीत अँनिमिया प्रतिबंध,उपचार व समुपदेशन याविषयी मार्गदर्शन

राष्ट्रीय पोषण महा १ ते ३० सप्टेंबर २०२३ मध्ये अंगणवाडीत अँनिमिया प्रतिबंध,उपचार व समुपदेशन याविषयी मार्गदर्शन

बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी) जि.नाशिक.अंगणवाडी क्र.७५.मनमाड विभाग येथे श्री. चंद्रशेखर पगारे...

read more
गृहभेटीच्या माध्यमातुन केली जात आहे परस बाग,पोषणवाटीका तयार करणे विषयीची जनजागृती

गृहभेटीच्या माध्यमातुन केली जात आहे परस बाग,पोषणवाटीका तयार करणे विषयीची जनजागृती

बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी) जि.नाशिक.अंगणवाडी क्र.७५.मनमाड विभाग येथे श्री. चंद्रशेखर पगारे...

read more
बघा व्हिडिओ – भाद्रपद महागणेशोत्सव 2023 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग नवव्या वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) संपन्न गणेश भक्तांचा उदंड प्रतिसाद

बघा व्हिडिओ – भाद्रपद महागणेशोत्सव 2023 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग नवव्या वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) संपन्न गणेश भक्तांचा उदंड प्रतिसाद

मनमाड - आम्ही परंपरा पाळतो... आम्ही संस्कृती चे रक्षण करतो.... हे ब्रीद घेऊन मनमाड शहरात धार्मिक...

read more
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद नांदगाव तालुका अध्यक्ष पदी सौ. चंद्रकला बोरसे

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद नांदगाव तालुका अध्यक्ष पदी सौ. चंद्रकला बोरसे

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद नांदगाव तालुका महिला अध्यक्ष पदी सौ.चंद्रकला राजेंद्र बोरसे...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]