loader image
[ays_poll id=7]

२१ मार्च पासून १२ ते १४ वयोगटाच्या मुला – मुलींसाठी शाळानिहाय होणार लसीकरण

Mar 19, 2022

दि २१ मार्च २०२२ पासुन १२ ते १४ वयोगटातील मुला – मुलीं साठी कोविड-19 लसीकरण चा CORBEVAX लसीचा डोस शहरातील सर्व शाळानिहाय सुरू होत आहे.

मनमाड नगरपरिषद व पंचायत समिती, नांदगाव यांचेमार्फत दिनांक- २१ मार्च २०२२ पासुन १२ ते १४ वयोगटातील मुला-मुलींसाठी कोविड-19 लसीकरण चा CORBEVAX लसीचा डोस शहरातील सर्व शाळानिहाय सुरू होत आहे.

तरी सर्व शाळा मुख्याध्यापक,शिक्षक, पालक यांना यांना कळविण्यात येते की त्यांनी आपल्या शाळेतील १२ ते १४ वयोगटातील विद्यार्थी यांना लसीकरणाचा लाभ मिळवून द्यावा.
__
▪️ लस – कॉर्बेव्हॅक्स
▪️ 12-14 वर्षे वयोगटातील मुला मुलींचे लसीकरण
▪️ डोस मात्रा – 0.5 मि.ली
▪️ कॉर्बेव्हॅक्स 2 डोस.
▪️ पहिल्या डोसच्या २८ दिवसांनंतर दुसरा डोस
▪️ लसीचा प्रकार – आरबीडी प्रोटीन सबयुनिट

लक्षात घेण्यासारखे IMP मुद्दे

अ) 2007 मध्ये जन्मलेले लाभार्थी केवळ COVAXIN साठी पात्र असतील

ब) 2008 आणि 2009 मध्ये जन्मलेले लाभार्थी फक्त Corbevax साठी पात्र असतील.

क) 2010 जन्म – फक्त corbevax मिळेल. तथापि लसीकरणाच्या वेळी लाभार्थी

▪️ लसीकरणाच्या तारखेला 12 वर्षांचा असेल तरच प्रणाली पुढे जाण्यास परवानगी देईल. (म्हणजे जर 12 वा वाढदिवस झाला तरच तो/ती पात्र असेल)

▪️ 11 वर्षे रनिंग सध्या पात्र नाहीत

लसीकरणासाठी खालील बाबी आवश्यक आहे.
1.मोबाईल क्रमांक
(विद्यार्थ्यी अथवा पालक यांचा)

2. विद्यार्थ्यी यांचे आधार कार्ड

3. लस घेण्यापूर्वी किमान 1 तास भर अगोदर पोटभर जेवण केलेले असावे.

लस बाबतचे कोणतेही गैरसमज पालकांनी बाळगु नये.

असे आवाहन मा. तालुका आरोग्य अधिकारी, पंचायत समिती, नांदगाव व मा. प्रशासक तथा मुख्याधिकारी, नगरपरिषद मनमाड यांनी केले आहे.

अजून बातम्या वाचा..

मतदार संघातील धार्मिक स्थळ विकासासाठी केंद्राकडून निधी मिळावा – आ. कांदेच्या शिष्ट मंडळाने घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट

मतदार संघातील धार्मिक स्थळ विकासासाठी केंद्राकडून निधी मिळावा – आ. कांदेच्या शिष्ट मंडळाने घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट

नांदगाव - मनमाड शहर तसेच मतदार संघातील धार्मिक स्थळाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्रीय पर्यटन...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी...

read more
नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

    मनमाड येथे *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या वाढदिवसानिमित्त *आमदार...

read more
*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

  *मनमाड* महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे...

read more
.