Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

आर्थिक नियोजन – काळाची गरज; चांदवड तंत्रनिकेतनमध्ये उद्योजकता विकास कार्यक्रम

Mar 25, 2022

सध्याच्या युगात उद्योजकतेला जास्त महत्त्व प्राप्त झाले आहे. केंद्र व राज्य शासनाचे धोरण उद्योजकतेला अनुकूल आहे, त्याचा नक्कीच विद्यार्थ्यांना फायदा झाल्याशिवाय राहणार नाही.
विद्यार्थ्यांना उद्योजक होण्याकरिता लागणारी माहिती,मदत व प्रोत्साहन मिळावे व त्याचा फायदा विद्यार्थ्यासह देशाला व समाजाला व्हावा याच हेतुने येथील श्री नेमीनाथ जैन ब्रम्हचर्याश्रम संचालित श्री एच.एच.जे.बी. तंत्रनिकेतन सिव्हील विभागातर्फे अंतिम वर्ष विद्यार्थ्यांकरिता तीन दिवसीय उद्योजकता विकास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात तंत्रनिकेतनचे माजी विद्यार्थी व यशस्वी इंजिनिअर व उद्योजक श्री मधुर गुजराथी यांनी विद्यार्थ्यांना नवीन उद्योग उभा करताना येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाय यावर त्यांनी मार्गदर्शन केले नंतरच्या सत्रात तंत्रनिकेतनचे माजी विद्यार्थी व बँकेचे व्यवस्थापक श्री गणेश महाले यांनी नवीन उद्योग उभारणीसाठी आपण बँकेची कशी मदत घेऊ शकतो याविषयी मार्गदर्शन केले. प्रसिध्द आर्थिक सल्लागार डॉ. देवेंन्द्र दगडे यांनी नवीन प्रोजेक्ट करीता प्रोजेक्ट रिपोर्ट कसा तयार करावा व आर्थिक नियोजनाचे महत्व याविषयी मार्गदर्शन केले.त्यानंतरच्या सत्रात बांधकाम व्यावसायिक श्री मनोज पगारे यांनी बांधकाम व्यावसायाबद्दल सखोल मार्गदर्शन केले तसेच त्यांच्या चालू प्रोजेक्ट बद्दल व परिसरात नवीन येणाऱ्या प्रोजेक्ट बद्दल मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाकरिता प्राचार्य डॉ.विशाल वानखेडे विभागप्रमुख प्रा.एस.एच. गौडा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.दीपक पवार,प्रा.वैभव राजनोर,श्री अक्षय खैरनार यांनी परिश्रम घेतले. विश्वस्त समितीचे अध्यक्ष मा.श्री बेबीलालजी संचेती व विश्वस्त समितीचे उपाध्यक्ष मा.श्री. दिनेशजी लोढा, मानद सचिव मा.श्री. जवाहरलालजी आबड, प्रबंध समितीचे अध्यक्ष मा.श्री. अजीतकुमारजी सुराणा, प्रबंध समितीचे उपाध्यक्ष आणि तंत्रनिकेतनाचे समन्वयक मा.श्री. अरविंदकुमारजी भन्साळी, सह मानद सचिव मा.श्री. झुंबरलालजी भंडारी, व तंत्रनिकेतनाचे मुख्य समन्वयक तथा प्रबंध समिती सदस्य मा.श्री. राजेंद्रकुमारजी बंब यांनी या आयोजनाबद्दल संबंधितांचे अभिनंदन केले .

अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]