loader image

तापमान कमालीचा वाढतोय : उन्हाच्या तडाख्या पासून वाचण्यासाठी हे कराच !

Mar 28, 2022


अरे … उन्हाळा येत आहे !!! दिवसाचे तापमान वेगाने वाढत आहे. मुले त्यांच्या उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद घेऊ इच्छित आहे.परंतु असह्य उष्णते मुळे ते बाहेर खेळण्यास जाऊ शकत नाहीत. हे असेच चालू राहिल्यास आपल्याला गंभीर परिस्थिती आणि समस्यांना तोंड द्यावे लागेल. आपल्याला माहित आहे की, दरवर्षी आपल्याला त्याच परिस्थितीचा सामना करावा लागतो. पण यावर्षी हि परिस्थिती थोडी वेगळी आहे. कारण अत्यंत उष्णता आहे. जिल्ह्यात उच्च तापमान नोंदवले गेले आहे. बाहेर जाताना आपल्याला स्वतःची खूप काळजी घेणे आवश्यक आहे. काळजी घेण्यात हरगर्जी पणा केल्याने जीवनशैलीवर खूप दुरोगामी परिमाण होऊ शकतात. तसेच वृद्ध , मधुमेह , मूत्रपिंड, अर्धांगवायू , हृदय रोग , या रुग्णांनी यादिवसात विशेष काळजी घ्यावी.तापमान वाढीमुळे शरीरातील पाण्याच्या कमतरते मुळे मृत्यूचा धोका उधभवू शकतो.सुरवातीला अगदी साधारण वाटणारी लक्षणे जर वेळेत आपण ओळखली नाही तर गंभीर स्वरूप धारण करू शकतात. अगदी साध्या वाटणाऱ्या अशा काही गोष्टी आपण या उन्हाळ्यात पाळल्यास आपल्याला हे टाळता येऊ शकते. अत्यंत उष्ण वातावरणात फिरल्याने होणारे काही परिणाम येथे नमूद केले आहेत, शरीराचे तापमान नियंत्रित करण्यात असमर्थता असते ज्यामुळे उष्माघात होतो. ही परीस्थिती सावधगिरी बाळगून नियंत्रित केली जाऊ शकते.
उष्माघाताची लक्षणे:

  • उच्च तापमान
  • मळमळणे
  • उलटया होणे
  • भूक एकदम मंदावणे
  • पाण्याचा अभाव / तहान लागणे
  • घाम येणे
  • श्वास लागणे
  • गंभीर डोकेदुखी
  • सततची चीड चीड
  • त्वचेवर लालसरपणा
  • तोंडाला कोरड पडणे
  • श्वास घेण्यात अडथळा
  • अस्वस्थता जाणवणे
  • लघवी कमी होणे
  • लघवीच्या जागी जळ जळ
    सावधगिरी बाळगणे / काळजी घेणे :
  • भरपूर पाणी, द्रव्य पदार्थ, फळांचा रस घ्या
  • स्वत:ला हायड्रेट ठेवा
  • शक्य असल्यास दररोज 3 ते 4 लीटर पाणी प्या.
  • घट्ट कपडे वापरणे टाळा. फिक्या रंगाचे कपडे वापरणे पसंत करा
  • दिवसा शक्यतो घरातच रहाणे पसंत करा. बाहेर पडणे टाळा
  • बाहेर जात असताना सनस्क्रीन लोशन लावूनच जा .
  • बाहेर जातावेळी डोक्यावर टोपी , उपरणे , बांधावे
  • मुलांना दिवसा किंवा सूर्यकिरणात खेळू देऊ नका
  • उन्हाळ्यात अल्कोहोल टाळा
    मूत्रपिंड रुग्णांनी सावध असणे आवश्यक आहे,
    सामान्य लोकांच्या तुलनेत, मूत्रपिंडाच्या रोगाच्या रुग्णांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. सर्वांसारखे, त्यांनी फळे, फळांचे रस, नारळ पाणी, लिंबू पाणी, इत्यादी घेऊ नये. काही बी पी ची औषधे जसे डुरेटिकस पाणी आणि सोडियम यांचे प्रमाण कमी करते ज्याने आपल्याला उष्माघाताचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे लोकांनी उन्हाळ्यात या औषधाचा वापर करू नये. कारण या औषधांनी व्यक्तींना उष्माघाताचा धोका असतो. मूत्रपिंड रोग रुग्णांनी उन्हाळ्यात औषधोपचार करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

डॉ. तेजस साकळे
मेंदूविकार तज्ञ्
अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल ,नाशिक
मो. 8547421744


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांकडून रांगोळी, पोस्टर्सद्वारे एचआयव्ही एड्स संदर्भात जनजागृती उपक्रम

मनमाड महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांकडून रांगोळी, पोस्टर्सद्वारे एचआयव्ही एड्स संदर्भात जनजागृती उपक्रम

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना,...

read more
आमदार सुहास कांदे यांच्या माध्यमातून मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी नागरिक नाशिक येथे रवाना

आमदार सुहास कांदे यांच्या माध्यमातून मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी नागरिक नाशिक येथे रवाना

आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या स्वखर्चातून सुरू असलेल्या मोफत फिरता दवाखाना व मेडिकल कॅम्प च्या...

read more
अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्स तर्फे इमर्जन्सी मेडिसिन डे निमित्त जनजागृती अभियान

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्स तर्फे इमर्जन्सी मेडिसिन डे निमित्त जनजागृती अभियान

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलच्या वतीने जागतिक आपत्कालीन औषध दिनानिमित्त नाशिकमधील ट्रॅफिक सिग्नलवर...

read more
नांदगाव तालुक्यातील जनतेसाठी आ. सुहास कांदे यांच्यामार्फत मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर

नांदगाव तालुक्यातील जनतेसाठी आ. सुहास कांदे यांच्यामार्फत मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर

नांदगाव सोमनाथ घोंगाणे नांदगाव तालुक्यातील जनते साठी आ. सुहास कांदे यांच्या स्वखर्चातून मोतीबिंदू...

read more
.