loader image
[ays_poll id=7]

विजेचे संकट बिकट; ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी घेतला मोठा निर्णय !!

Mar 29, 2022


आधीच एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे राज्यातील ग्रामीण भागांना मोठा फटका बसला आहे, अशात आता आणखी एका संपाचं संकट उभे राहिलं आहे. वीज वितरण व्यवस्थेचे खासगीकरण होणार असल्याच्या शक्यतेमुळे वीज महामंडळातील कर्मचारी संपावर गेले आहेत.

या संपामुळे ग्रामीण भागासह शहरी भागही काळोखात जाणार असल्याची शक्यता आहे. एकीकडे वाढत्या उष्णतेमुळे विजेची मागणी वाढू लागली आहे. तर, दुसरीकडे कर्मचाऱ्यांमध्ये खासगीकरणाचा उठवलेला वणवा यामुळं ऊर्जामंत्री सध्या अडचणीत सापडले आहेत.

प्रथमच नियमित वीज व कंत्राटी कर्मचारी एकत्र संपावर गेल्याने राज्य अंधारात जाण्याची शक्यता आहे. वीज कर्मचाऱ्यांच्या संपाचा चंद्रपूर येथील वीज केंद्रावर मोठा परिणाम झाला आहे. 60 मेगावॅट क्षमतेचे पाच जलविद्युत युनिट बंद झाले आहेत. सोबतच 500 मेगावॅट क्षमतेचा सहा क्रमांकाचा एक संच तांत्रिक बिघाडामुळे सोमवारी, 28 मार्च रोजी दुपारी बंद झाला.

दरम्यान, वीज मंडळाच्या कुठल्याही कंपनीचे खासगीकरण केले जाणार नाही. वीज कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा करून तोडगा काढला जाईल, अशी ग्वाही ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीज कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करताना दिली होती. त्यासाठी आज मंगळवारी दुपारी 3 वाजता मंत्रालयात बैठकीचं आयोजन करण्यात आले होते.

मात्र कर्मचाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने नितीन राऊत यांनी मंगळवारची बैठक रद्द करण्याचा निर्णय घेत संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. जर कर्मचाऱ्यांनी संप मागे न घेतल्यास त्यांच्यावर मेस्मा अंतर्गत कारवाई करू असा इशारा नितीन राऊत यांनी दिला आहे.

काय आहेत वीज कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या?

– महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण कंपन्यांत सुरू करण्यात येत असलेले खाजगीकरण त्वरित थांबवा

– केंद्र सरकारच्या विद्युत (संशोधन) बिल 2021 खाजगीकरण धोरणाला विरोध

– तिन्ही वीज कंपन्यांत 30 हजार कंत्राटी आणि बाहयस्त्रोत कामगार यांना वयाच्या साठ वर्षापर्यंत नोकरीत संरक्षण प्रदान करा

– महानिर्मिती कंपनी संचलित करीत असलेले जलविद्युत केंद्र खाजगी उद्योजकांना देण्याचे धोरण त्वरित थांबवा

– तिन्ही कंपन्यातील रिक्त पदे भरण्यास होत असलेल्या दिरंगाई विरुद्ध

– तिन्ही कंपन्यातील कर्मचारी अभियंते व अधिका-यांच्या बदली धोरणावर एकतर्फी निर्णया विरुद्ध

– चारही कंपन्यातील वरिष्ठ पदावरील अनावश्यक भरती, बदल्या यांतील राजकिय हस्तक्षेप या प्रश्नाकरिता व खाजगीकरण धोरणाविरुद्ध

 


अजून बातम्या वाचा..

नाशिक विभागीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाडच्या खेळाडूंचे वर्चस्व १५ खेळाडूंची पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड

नाशिक विभागीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाडच्या खेळाडूंचे वर्चस्व १५ खेळाडूंची पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
भाजपा ➖ शिवसेना मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार सुहास अण्णा कांदे यांचे विजया साठी भाजपा मैदानात

भाजपा ➖ शिवसेना मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार सुहास अण्णा कांदे यांचे विजया साठी भाजपा मैदानात

नोव्हेंबर 2024 मध्ये नांदगाव विधानसभा मतदार संघातील भाजपा -शिवसेना -आरपीआय मित्र पक्ष महायुतीचे...

read more
जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये आकाश कंदील कार्यशाळा: चारशे विद्यार्थ्यांनी बनविले आकाश कंदील

जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये आकाश कंदील कार्यशाळा: चारशे विद्यार्थ्यांनी बनविले आकाश कंदील

नांदगाव, दिनांक. 25 ऑक्टोंबर 2024 येथील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूल मधील...

read more
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024  सोशल मीडियावर प्रचार करताना निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे पालन करावे  जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 सोशल मीडियावर प्रचार करताना निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे पालन करावे जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा

  नाशिक, दि. 23 (जिमाका वृत्तसेवा) : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता मा....

read more
.