Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

चांदवड तंत्रनिकेतनात शिक्षकांसाठी प्रभावी शिक्षणासाठीचे साधने या विषयावर फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम ई-प्रणाली द्वारे संपन्न

Mar 30, 2022

चांदवड येथील श्री नेमिनाथ जैन ब्रह्रमचर्याश्रम संचालित श्री एच एच जे बी तंत्रनिकेतन अंतर्गत सिव्हील इंजिनियरिंग विभागातर्फै दोन दिवसीय राज्यस्तरीय कर्मचारी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात संपूर्ण महाराष्ट्रातील विविध विभागातील शिक्षकांनी सहभाग घेतला या प्रशिक्षणात तज्ञ व्याख्याते प्रा. राजेंद्र ताथेड,तांत्रिक सल्लागार, श्री नेमीनाथ जैन ब्रह्रमचर्याश्रम चांदवड, प्रा.डॉ.महेश संघवी, उपप्राचार्य व विभागप्रमुख संगणक व माहिती तंत्रज्ञान विभाग,कांताबाई भवरलाल जैन अभियांत्रिकी महाविद्यालय, व सौ.स्नेहा आचलिया, सल्लागार यांनी या दोन दिवसीय कार्यशाळेत आपले मोलाचे विचार मांडले.
प्रा. राजेंद्र ताथेड, यांनी आजच्या या धकाधकीच्या जीवनात प्रभावी शिक्षण कसे असावे यावर आपले मत मांडले. तसेच प्रा.डॉ.महेश संघवी, यांनी शिक्षकांसाठी वेळेचे व्यवस्थापन कसे करावे व आपला वेळ कसा वाचवावा या बाबींवर सविस्तर मार्गदर्शन केले. सौ.स्नेहा आचलिया, यांनी या धकाधकीच्या जीवनात येणाऱ्या तणावाचे व्यवस्थापन कसे कराचे व तणाव मुक्त कसे राहायचे व सुखी जीवनाचा मंत्र त्यांनी सांगून विस्तृत मार्गदर्शन केले. वरील तीनही व्याख्यात्यांनी ई-प्रणाली द्वारे आपले विचार व्यक्त केले.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील एकूण १६० प्राध्यापकांना लाभ मिळाला, तसेच सहभागी प्राध्यापकांना ई प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन सिव्हील विभागातील प्राध्यापक.कु. अंकिता डुंगरवाल, कु. ऋतुजा सोनवणे, तसेच तांत्रिक सहाय्यक श्री अक्षय खैरनार समवेत सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले. कार्यक्रमासाठी विभागप्रमुख एस. एच. गौडा व प्राचार्य डॉ. व्ही. ए. वानखेडे. यांनी मार्गदर्शन केले. विश्वस्त समितीचे अध्यक्ष मा.श्री बेबीलालजी संचेती व विश्वस्त समितीचे उपाध्यक्ष मा. श्री दिनेशजी लोढा, मानद सचिव मा.श्री जवाहरलालजी आबड, प्रबंध समितीचे अध्यक्ष मा.श्री अजीतकुमारजी सुराणा, प्रबंध समितीचे उपाध्यक्ष आणि तंत्रनिकेतनाचे समन्वयक श्री अरविंदकुमारजी भन्साळी, सह मानद सचिव मा.श्री. झुंबरलालजी भंडारी व तंत्रनिकेतनाचे मुख्य समन्वयक तथा प्रबंध समिती सदस्य, श्री राजेद्रकुमारजी बंब यांनी या दोन दिवसीय राज्यस्तरीय कर्मचारी प्रशिक्षण कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल सर्वांचे अभिनंदन करुन समाधान व्यक्त केले.

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ-नांदगाव – ४० गाव रोडवर गॅस सिलेंडर वाहतूक करणाऱ्या कंटेनरचा अपघात – चालक जखमी

बघा व्हिडिओ-नांदगाव – ४० गाव रोडवर गॅस सिलेंडर वाहतूक करणाऱ्या कंटेनरचा अपघात – चालक जखमी

नांदगांव : मारुती जगधने भरधाव वेगाने वाहन चालवल्यामुळे अपघात होण्याची शक्यता खूप वाढते. त्यात काही...

read more
मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरासाईराज परदेशी व तृप्ती पाराशर यांची जागतिक यूथ स्पर्धेसाठी निवड

मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरासाईराज परदेशी व तृप्ती पाराशर यांची जागतिक यूथ स्पर्धेसाठी निवड

महाराष्ट्रातील एकमेव आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती शेखर पाराशर यांची सलग सातव्या आंतरराष्ट्रीय...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]