Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ सिटू संघटनेचा मोर्चा

Mar 30, 2022

मोदी सरकारने मंजूर केलेल्या कामगार विरोधी चार श्रम संहिता रद्द करून प्रस्थापित कामगार कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी,खाजगीकरण, कंत्राटी करणाचे धोरण मागे घ्यावे, बेरोजगार व महागाईला अटकाव करावा यासह इतर मागण्यांसाठी आज सिटू संघटनेच्या वतीने मोर्चा काढत आंदोलन करण्यात आले यावेळी जोरदार घोषणाबाजी करत मंडल अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले

सिटू संघटनेचे नेते तथा जनरल सेक्रेटरी रामदास पगारे, अध्यक्ष किशोर आहिरे यांच्या नेतृत्वाखाली हातात सिटू संघटनेचे लाल ध्वज घेऊन पालिका कामगार यांच्यासह इतर संघटनेचे कामगार मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते शहरातील विविध मार्गाने जात मोर्चा एकात्मता चौकात आल्यानंतर जोरदार निर्दशने करण्यात आली यावेळी कामगारांवर अन्याय करणारे, कामगारांचे कायदे बदलणाऱ्या सरकारचा निषेध करण्यात आला यावेळी रामदास पगारे यांनी आपल्या भाषणातून कामगारांना संबोधित केले तसेच केंद्र सरकारने २९ कामगार कायदे रद्द करून कामगार विरोधी चार श्रम संहिता मंजूर केले आहेत. त्यामुळे कामगारावर गुलामगिरी लादण्यात येणार आहे. या चार श्रम संहिता रद्द कराव्यात व प्रस्थापित कामगार कायद्याची अंमलबजाणी करावी अशी कामगार संघटनांची मागणी आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारने सर्व सार्वजनिक उदयोग व सेवा यांचे खाजगीकरण करण्याचे ठरविले आहे. देशाची सार्वजनिक मालमत्ता कवडीमोल किमतीने खाजगी कंपन्यांना व मित्रांच्या कंपन्यांना सरकार विकत आहे. बँका त्याचबरोबर विमा उदयोगात असेच धोरण घेतल्यामुळे देशाची वित्त व्यवस्था आणि अर्थव्यवस्था यावरच घाला घातला जात आहे व हे सर्व देशी विदेशी बड्या कार्पोरेट कंपन्यांना फायदा व्हावा यासाठी मोदी सरकार हे धोरण आजमावत आहे. याला कामगार संघटनांचा तीव्र विरोध आहे. कोणत्याही स्वरुपात सार्वजनिक उदयोगाचे खाजगीकरणकरु नये व राष्ट्रीय निर्गुतवणूक धोरण रद्द करावे सरकारी व खाजगी क्षेत्रात कंत्राटी करणाच्या धोरणामुळे कामगार वर्गाची तीव्र पिळवणूक होत आहे. लाखोंच्या संख्येने कंत्राटी कामगार वर्षानुवर्षे काम केले तरी त्यांना कायम केले जात नाही. अशा कंत्राटी कामगारांना नियमित करण्यात यावे व समान कामासाठी समान वेतन आणि लाभ द्यावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली यावेळी तुकाराम सोनजे, नामदेव राठोड, जॉनी जॉर्ज, विकास गायकवाड, असलाम शेख, अरुण दराडे, सुभाष केदारे, सागर आहिरे, सुनंदा दरवडे यांच्यासह मोठ्या संख्येने विविध कामगार संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ – प्रशासनाने नांदगाव तालुका त्वरित दुष्काळी जाहीर करावा – उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची मागणी

बघा व्हिडिओ – प्रशासनाने नांदगाव तालुका त्वरित दुष्काळी जाहीर करावा – उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची मागणी

मनमाड - नाशिक जिल्ह्यात यंदा पावसाने दडी मारल्याने दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागत असून...

read more
नांदगाव येथील रेल्वे अभियंता आणि कर्मचाऱ्याची समय सूचकता – प्रसंगावधान राखत होणारा रेल्वे अपघात,वित्तहानी आणि जीवितहानी पासून रक्षण

नांदगाव येथील रेल्वे अभियंता आणि कर्मचाऱ्याची समय सूचकता – प्रसंगावधान राखत होणारा रेल्वे अपघात,वित्तहानी आणि जीवितहानी पासून रक्षण

मनमाड - नांदगाव डेपो मधील हेल्पर खलाशी या पदावर नियुक्त असलेले कर्मचारी दगडू शेषराव आहेर हे...

read more
नांदगाव मतदारसंघात दुष्काळ जाहीर करण्याबाबत आमदार सुहास आण्णा कांदे आग्रही : मुख्यमंत्री यांची सकारात्मक भूमिका

नांदगाव मतदारसंघात दुष्काळ जाहीर करण्याबाबत आमदार सुहास आण्णा कांदे आग्रही : मुख्यमंत्री यांची सकारात्मक भूमिका

मनमाड - आमदार सुहास आण्णा कांदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत नांदगाव...

read more
दिवाळी आनंदाची – राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना फराळाचे वाटप

दिवाळी आनंदाची – राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना फराळाचे वाटप

आपण समाजाचे काहीतरी देण लागतो, या उक्ती प्रमाणे दरवर्षी मनमाड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]