Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मदरसन या नामांकीत कंपनीमध्ये चांदवड पॉलिटेक्निक येथील विद्यार्थ्यांची निवड

Mar 31, 2022

चांदवड, येथील श्री नेमीनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संचलित श्री एच. एच. जे. बी. पॉलिटेक्निक अंतर्गत मेकॅनिकल इंजिनियरिंग विभागातर्फे प्लेसमेंट ड्राइव्हचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी मदरसन ऑटोमोटिव्ह टेक्नोलॉजी अँड इंजिनियरिंग, पुणे यांमार्फत शेवटच्या वर्षात शिकत असलेल्या ९ विद्यार्थ्यांची प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये निवड केली. कॅम्पस प्लेसमेंटमधून नोकरी मिळणे ही विद्यार्थ्याच्या करिअरची उत्तम सुरुवात असते. याप्रसंगी विद्यार्थ्यांचे संप्रेषण कौशल्ये ,आत्मविश्वास,नेतृत्व ,विषयावरील अतिरिक्त कौशल्ये, घडामोडींचे ज्ञान, विश्लेषणात्मक आणि सर्जनशील विचार या बाबींचा प्रामुख्याने संदर्भ घेवुन मूल्‍यमापन केले.
या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये मेकॅनिकल इंजिनियरिंग विभागाचे विवेक सोनवणे, पवन पवार, सचिन उगले, हर्षल देवरे ,विनोद जाधव, ऋषिकेश गांगुर्डे , ऋषिकेश कोल्हे,किरण दराडे,प्रविण गायकवाड यांनी यश संपादित केले. या कामगिरीचे श्रेय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. व्ही. ए. वानखेडे तसेच टीपीओ म्हणून काम पाहत असणारे श्री वाय. एल. काकुस्ते, श्री जि.जे.पगार व सर्व विभागांचे विभागप्रमुख, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना जाते. विविध नामांकित कंपन्यांमध्ये या शैक्षणिक वर्षात ७० विद्यार्थ्यांची निवड-करण्यात-आली.
विश्वस्त समितीचे अध्यक्ष मा.श्री बेबीलालजी संचेती व विश्वस्त समितीचे उपाध्यक्ष मा. श्री दिनेशजी लोढा, मानद सचिव मा.श्री जवाहरलालजी आबड, प्रबंध समितीचे अध्यक्ष मा.श्री अजीतकुमारजी सुराणा, प्रबंध समितीचे उपाध्यक्ष आणि तंत्रनिकेतनाचे समन्वयक मा. श्री अरविंदकुमारजी भन्साळी, सह मानद सचिव मा.श्री. झुंबरलालजी भंडारी, व तंत्रनिकेतनाचे मुख्य समन्वयक तथा प्रबंध समिती सदस्य मा. श्री राजेंद्रकुमारजी बंब यांनी या आयोजनाबद्दल संबंधितांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]