loader image
[ays_poll id=7]

ईडी ने अखेर संजय राऊत यांची मालमत्ता केली जप्त ; राऊतांची सूचक प्रतिक्रिया

Apr 5, 2022


भाजप आणि ईडी (ED) विरोधात सातत्याने परखड आणि थेट भूमिका घेणारे शिवसेना नेते व खासदार संजय राऊत हेही आता ईडीच्या (सक्तवसुली संचलनालय) रडारवर आलेले आहेत. राऊत यांच्या अलिबागमध्ये असणाऱ्या स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. आतापर्यंत महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांवर ईडीने कारवाई केली होती. पण राऊत यांच्यावर कारवाई झाल्यानंतर सगळीकडे मोठी खळबळ उडाली आहे.

ही आजवरची सगळ्यात मोठी कारवाई असल्याचे समजत आहे. अलिबागमधील जमिनीचे आठ तुकडे, दादरमधील एक फ्लॅट जप्त करण्यात आलाय. पत्राचाळ जमीन घोटाळाप्रकरणी ही कारवाई केल्याचे समजते. या घोटाळ्यातील पैसे हे अलिबाग येथील जमीन खरेदीसाठी वापरले म्हणून ही कारवाई करण्यात आल्याचे समजते.

पत्राचाळ जमीन घोटाळाप्रकरणी ही कारवाई केल्याची माहिती सूत्रांकडून सामोर आली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर चर्चेत आलेला पत्राचाळ घोटाळा1034 कोटींचा असल्याचे समजते. याप्रकरणी संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना ईडीने यापूर्वीच अटक केली आहे.

या कारवाईनंतर राऊत यांनी आपली पहिली प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, ईडीने अलिबागमधील जी जमीन जप्त केली आहे, ती आम्ही २००९ साली कष्टाच्या पैशातून विकत घेतली होती. परंतु, ईडीने कोणतीही चौकशी न करता या जमिनी जप्त केल्या. एवढेच नव्हे तर ईडीने आम्ही सध्या वास्तव्याला असलेला दादरमधील फ्लॅटही जप्त केला आहे. यापैकी एकही मालमत्ता आर्थिक गैरव्यवहार करून घेतल्याचे सिद्ध झाले तर आम्ही ही सर्व संपत्ती भाजपला दान करू.

माझं मुंबईतील राहतं घर आणि अलिबागमधील ५० गुंठ्यांची जमीन, याला काही संपत्ती म्हणता येणार नाही. अशा कारवायांमुळे संजय राऊत किंवा शिवसेना झुकणार नाही, असेही पुढे बोलताना राऊत म्हणाले.

ईडी च्या कारवाई नंतर संजय राऊत यांचे ट्विट…

https://twitter.com/rautsanjay61/status/1511329052086267909?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1511329052086267909%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Findiadarpanlive.com%2Fshivsena-mp-sanjay-raut-on-ed-action%2F


अजून बातम्या वाचा..

मतदार संघातील धार्मिक स्थळ विकासासाठी केंद्राकडून निधी मिळावा – आ. कांदेच्या शिष्ट मंडळाने घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट

मतदार संघातील धार्मिक स्थळ विकासासाठी केंद्राकडून निधी मिळावा – आ. कांदेच्या शिष्ट मंडळाने घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट

नांदगाव - मनमाड शहर तसेच मतदार संघातील धार्मिक स्थळाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्रीय पर्यटन...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी...

read more
नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

    मनमाड येथे *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या वाढदिवसानिमित्त *आमदार...

read more
*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

  *मनमाड* महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे...

read more
.