Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

डॉ. मुरहरी केळे महावितरणच्या संचालक (वाणिज्य) पदी रुजू

Apr 6, 2022

महावितरण कंपनीच्या संचालक (वाणिज्य) पदाचा डॉ. मुरहरी सोपानराव केळे यांनी नुकताच कार्यभार स्वीकारला. त्यांची या पदावर थेट भरती प्रक्रियेतून निवड झाली आहे. याआधी ते मुख्य अभियंता (देयके व महसूल) म्हणून महावितरणमध्ये कार्यरत होते.
वीज वितरणाच्या क्षेत्रातील तज्ज्ञ व विश्लेषक म्हणून ओळख असणारे डॉ. केळे हे मूळचे उस्मानाबाद जिल्ह्यातील रहिवासी आहे. तत्कालिन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळामध्ये ते कनिष्ठ अभियंता म्हणून १९९१ मध्ये रुजू झाले. त्यानंतर विविध वरीष्ठ पदांवर त्यांनी चिपळून, गुहागर, खेड, भिवंडी, मुंबई, पेण, नागपूर आदी ठिकाणी काम केले आहे. तर अकोला परिमंडलासह महावितरणच्या मुख्यालयात वितरण व वाणिज्यिक, तांत्रिक आस्थापना, देयके व महसूल या विभागांचे मुख्य अभियंता म्हणून काम केले आहे. मध्यप्रदेश पश्चिम क्षेत्र विद्युत वितरण कंपनीमध्ये संचालक (तांत्रिक) तसेच वीजपुरवठ्यासाठी अतिशय आहानात्मक असलेल्या त्रिपुरा राज्याच्या विद्युत मंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून डॉ. मुरहरी केळे यांनी कार्यकाळ पूर्ण केला आहे.
संत साहित्याचे गाढे अभ्यासक व साहित्यिक असलेले डॉ. मुरहरी केळे यांचे मराठी व इंग्रजी भाषेमध्ये पुस्तके प्रकाशित झाले आहे. अनेक पुस्तकांचे त्यांनी संपादन देखील केले आहे. सोबतच वीज वितरणासह प्रामुख्याने ‘स्मार्ट मीटर’संबंधी त्यांनी विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले आहेत. नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाने ‘पीएचडी’ पदवी प्रदान केली आहे. तसेच अभियांत्रिकीसह व्यवस्थापन, विधी, वाणिज्य, नियामक, लेखा परीक्षण आदी विषयांमध्ये त्यांनी शैक्षणिक पदव्या संपादन केल्या आहेत. विद्युत क्षेत्रातील कामाचा त्यांना सुमारे ३२ वर्षांचा अनुभव आहे.

अजून बातम्या वाचा..

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, मनमाड येथील...

read more
श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड - शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]