loader image
[ays_poll id=7]

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल मध्ये “हार्ट फेल्युअर क्लिनिक” चा शुभारंभ

Apr 7, 2022


जगभरात तब्बल २६ दशलक्ष लोक “हार्ट फेल्युअर” या आजारामुळे प्रभावित असून यापैकी भारतात हार्ट फेल्युअरचे जवळपास १० दशलक्ष लोक आहेत. लोक याला हार्ट अटॅक आल्यानंतरची समस्या समजून गोंधळून जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या आजाराविषयी जागरुकता निर्माण करणे गरजेचे झाले आहे. याच अनुषंगाने जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल नाशिक येथे ” हार्ट फेल्युअर क्लिनिक” चा आज शुभारंभ करण्यात आला. प्रत्येक शनिवारी, दुपारी १२ ते ४ यावेळेत हार्ट फेल्युअर रूग्णांची सवलतीच्या दरात तपासणी आणि चाचण्या करण्यात येणार आहे. यासाठी डॉ सुधिर शेतकर यांच्या सोबत अनुभवी ह्र्दय विकार तज्ज्ञांची टिम कार्यरत राहणार असून यामध्ये रूग्णाला आहार तज्ज्ञांचा सल्ला व मार्गदर्शन मोफत देण्यात येणार आहे.
या उद्घाटन सोहळ्यास अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलचे मेडिकल डायरेक्टर डॉ. सुशील पारख , केंद्र प्रमुख श्री समिर तुळजापूरकर , मार्केटिंग हेड श्री नागेश मिश्रा , इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्टची टिम डॉ सुधिर शेतकर, डॉ सचिनकुमार पाटील , डॉ अभिषेक संकलेचा , डॉ कांचन भंबारे आणि रुग्णालयातील डॉक्टर ,वैद्यकीय कर्मचारी, रुग्ण व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते

अध्यक्षीय भाषणात डॉ सुधिर शेतकर यांनी हार्ट फेल्युअर बाबत सविस्तर माहिती देताना सांगितले की,
सहा विविध देशांच्या अभ्यासानंतर हार्ट फेल्युअरमुळे होणारा मृत्यूदर २३ टक्केे असल्याचा खुलासा हार्ट फेल्युअर इंटरनॅशनल कॉन्जेस्टिव्ह हार्ट फेल्युअर (इंटर- सीएचएफ)द्वारे करण्यात आला आहे. यांचे मुख्य कारणात जनजागृतीचा अभाव हा ही असल्याचं निदर्शनास आले आहे.
“हार्ट फेल्‍युअर” चा सरळ अर्थ म्‍हणजे तुमचे हृदय जितक्‍या चांगल्‍या प्रकारे करायला पाहिजे तसे रक्‍त पंप करू शकत नाही. हार्ट फेल्‍युअर म्‍हणजे असे नाही की, तुमचे हृदय बंद पडत आहे आणि तुम्‍हांला हार्ट अटॅक येत आहे .(परंतु, हार्ट फेल्‍युअर असलेल्‍या ब-याच लोकांना पूर्वी केव्‍हा तरी हार्ट अटॅक आलेला असतो). हार्ट फेल्‍युअरला कंजेस्टिव्‍ह हार्ट फेल्‍युअर (CHF) देखील म्‍हणतात. ‘कंजेस्टिव्‍ह’ म्हणजे हृदय योग्‍य प्रकारे रक्‍त पंप न करू शकल्‍यामुळे शरीरात फ्ल्युईड (द्रव पदार्थ) तयार होणे.
जेव्हा हृदयाची रक्त पंपिंग करण्याची क्षमता ३५ % पेक्षा कमी होते. त्यावेळी रुग्णाला “हार्ट फेल्युअर” होण्याची शक्यता वाढते. प्रत्येक रुग्ण ज्याला हार्ट फेल्युअरची लक्षणे आहेत.आशा रुग्णांनी 2D इको हि वैद्यकीय चाचणी करून स्वतःच्या ह्रदयाची रक्त पंपिंग करण्याची क्षमता जाणून घेतली पाहिजे . ज्यांची हृदयाची रक्त पंपिंग म्हणजेच इंजेक्शन फॅक्शन ( EF ) ३५ % पेक्षा कमी आहे. त्यांनी त्वरित हार्ट फेल्युअर क्लिनिक मध्ये येऊन वैद्यकीय सल्ला व मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे.

हार्ट फेल्‍युअरची लक्षणे‌.
हार्ट फेल्‍युअर असलेल्‍या लोकांमध्‍ये काही लक्षणे किंवा त्रास दिसून येतात. जसे की,
• २डी इको चाचणी परीक्षणानुसार हृदयाची रक्त पंप करण्याची क्षमता ( EF) ३५% टक्क्यांपेक्षा कमी असणे.
• श्‍वास पूर्णपणे न घेता येणे (कदाचित चालतांना, जिना चढतांना किंवा काही काम करतांना)
• निजल्‍यावर श्‍वास पूर्णपणे न घेता येणे
• भूक मंदावणे
• श्‍वास पूर्णपणे न घेता येण्‍यामुळे, रात्री झोपेतून उठणे
• व्‍यायाम करण्‍याची क्षमता कमी होवून, सामान्‍यपणे थकवा येणे
• पाय, पायाचे तळवे किंवा पायाच्‍या घोट्याजवळ सूज येणे
पोटावर सूज येणे
• हृदयाचे तीव्र किंवा अनियमित ठोके
• वेगाने वजन वाढणे (एका दिवसांत 1 किंवा 2 पाउंड प्रमाणे लागोपाठ 3 दिवस)
• जुना कफ किंवा छातीमध्‍ये घर-घर होणे.

हार्ट फेल्युअरपासून वाचण्यासाठी यामागील कारणांचे नियंत्रण करणे अत्यंत आवश्यक आहे. यामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण आहे तणाव. कारण तणावामुळेच बरेच आजार, जसे की मधुमेह, वजन वाढणे, उच्च रक्तदाब उद्भवू शकतात. पण भारतात लोक तणावासारख्या समस्यांवर जास्त लक्ष देत नाहीत, यामुळेच त्यांना हृदयाशी संबंधित आजार होण्याचा धोका जास्त होऊ शकतो. हृदयाच्या कमजोर मांसपेशींना पुन्हा बरे करता येऊ शकत नाही, म्हणूनच औषधे व थेरपींनी हे नियंत्रणात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.हा आजार नियंत्रित करण्याकरिता जीवनशैलीमध्ये बदल करणे अत्यंत आवश्यक आहे, ज्या लोकांना हार्ट फेल्युअरची समस्या आहे, त्यांनी आपल्या जीवनशैलीमध्ये काही बदल केले पाहिजेत, जेणेकरुन या समस्येला नियंत्रित करता येऊ शकेल.
• खाण्यामध्ये मीठाचे प्रमाण कमी करावे
• वजनावर नियंत्रण ठेवावे
• फिजिशीयनने सुचवलेलाच व्यायाम करावा
• डॉक्टरांनी सांगितलेली औषधे वेळेवर घ्यावीत
• वेगळी लक्षणे जाणवली तर डॉक्टरांना सांगावे
• मद्यपान व धूम्रपान करू नये
• वजन किंवा सूज कमी करण्याकरिता लोकांनी सांगितलेली कोणत्याही प्रकारची औषधे घेऊ नयेत.
• वेळेत निदान व उपचार केल्यास रुग्णाला यामुळे दिलासा मिळु शकतो असे डॉ.सुधिर शेतकर , यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले
उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे आभार अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलचे मार्केटिंग हेड श्री नागेश मिश्रा यांनी मानले
लोकांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे हा आजच्या “जागतिक आरोग्य दिवसाचा” उद्देश आहे… त्यानुसारच एक हॉस्पिटल म्हणून अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल, ज्या रुग्णांचे हृदय सामान्य पणे कार्य करत नाही, त्या रुग्णांसाठी हार्ट फेल्युअर क्लिनिकच्या रूपाने एक नवीन आशा निर्माण करत आहे. अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल, नेहमीच सगळ्यांना आरोग्याबद्दल जागरूक ठेवून त्यांना निरोगी आरोग्यासाठी मार्गदर्शन करत असते, त्याच अनुषंगाने आज हृदयविकार असलेल्या पेशंटसाठी हार्ट फेल्युअर क्लिनिक सुरू केले आहे..
ज्यात तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार विविध तपासण्या व सल्ला सवलतीच्या दरात केला जाईल.
तरी हॉस्पिटल कडून विनंती करण्यात येत आहे की सर्व हृदयविकाराने ग्रासलेल्या रुग्णांनी याचा नक्की फायदा घ्यावा.
समीर तुळजापूरकर.
केंद्र प्रमुख. अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल नाशिक,


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड = कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथे शिक्षण महर्षी, महात्मा गांधी विद्यामंदिर व...

read more
नांदगाव शहर व चांडक प्लॉट भागाला जोडणाऱ्या नवीन पुलाचे लोकार्पण सौ. अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते संपन्न.

नांदगाव शहर व चांडक प्लॉट भागाला जोडणाऱ्या नवीन पुलाचे लोकार्पण सौ. अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते संपन्न.

  आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून नांदगाव शहरातील चांडक प्लॉट भागातील व परिसरातील...

read more
व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली

व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड :. व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली....

read more
महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे व नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांचा भव्य नागरी सत्कार नाशिक स्वामीनारायण बँक्वेट हॉल येथे संपन्न झाला.

महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे व नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांचा भव्य नागरी सत्कार नाशिक स्वामीनारायण बँक्वेट हॉल येथे संपन्न झाला.

याप्रसंगी मंचावर नाशिक जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते. नागरी सत्कार...

read more
मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे कार्यसम्राट आमदार मा.सुहासआण्णा कांदे साहेब यांचा सत्कार.

मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे कार्यसम्राट आमदार मा.सुहासआण्णा कांदे साहेब यांचा सत्कार.

  मनमाड:-आपल्या नांदगाव तालुक्याचे लोकप्रिय,कार्यसम्राट, पाणीदार, क्रीडासम्राट दमदार आमदार...

read more
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

  नांदगाव - आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत देवाज बंगलो नांदगाव येथे राष्ट्रवादी...

read more
.