loader image
[ays_poll id=7]

भारतीय खाद्य निगम तर्फे अन्न योजना आणि सार्वजनिक वितरण कार्यक्रम संपन्न

Apr 12, 2022

भारतीय अन्न महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात भारतीय अन्न महामंडळ अर्थात भारतीय खाद्य निगम तर्फे आयोजित भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त अमृतमहोत्सव अंतर्गत अन्न योजना आणि सार्वजनिक वितरण कार्यक्रम भारतीय खाद्य निगम च्या क्रांती मैदान येथे संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमदार सुहास कांदे यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली.या वेळी भारत सरकारच्या खाद्य विभागाच्या विविध योजना जसे प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना , अंत्योदय योजना , अन्नपूर्णा योजना , संपूर्ण ग्रामीण योजना , मध्यान्न भोजन योजना , फॉरटीफाईड राईस यासारख्या अनेक योजनांची चित्रफितीतून सविस्तर माहिती देण्यात आली. व्यासपीठावर नायब तहसीलदार प्रमोद मोरे, माजी नगरसेवक साईनाथ गिडगे, शिवसेना शहरध्यक्ष मयूर बोरसे, माजी नगरध्यक्ष राजेंद्र आहिरे, भारतीय खाद्य निगम मंडळ कार्यालय मनमाडचे मंडळ प्रबंधक बी.एम.राऊत होते.कार्यरत अधिकारी कर्मचारीवृंद कामगार बंधु भगिनी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना लाभार्थी , मनमाडवासीयांची उपस्थिती लक्षणीय होती. यावेळी सुहास कांदे यांनी फॉरटीफाईड राईसचे महत्त्व सांगितले. तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना द्वारे भारतीय खाद्य निगमचे देशभरात झालेले खाद्यान्न वितरण या संदर्भात संबोधित केले . उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितित भारतीय खाद्य निगम मनमाड परिसर मधे राष्ट्रगीत सादर करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली . याप्रसंगी अनेक लाभार्थ्यांना पेढे भरवून तसेच पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिमांशू सिघल आणि वैष्णवी लकडे यांनी केले .

कोरोना काळात भारतीय खाद्य निगम द्वारे झालेले खाद्यान्न वितरण आणि कार्यप्रणालीवर मंडळ प्रबंधक बी.एम.राऊत यांनी वक्तव्य केले.कार्यक्रमाच्या शेवटी आभारव्यक्त के.एल.वाघ यानी केले.कार्यक्रमाच्या आयोजन प्रसंगी भा.खा.नि. मनमाडचे अनंता महाजन , तुषार गुंजाळ , प्रदीप दातिर , कैलाश शर्मा , प्रदिप मारकंडे , पूजा सिंह , प्रशांत जोशी, तुषार गुंजाळ, विक्रम शाहू आदिनी केले.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव, मारुती जगधने ६ मे 2025 तालुक्यातील उपलब्ध जलसाठे,त्यातील क्षमता, व शेती सिंचनाच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांसोबत आमदार सुहास कांदे यांची आढावा बैठक संपन्न.

नांदगाव, मारुती जगधने ६ मे 2025 तालुक्यातील उपलब्ध जलसाठे,त्यातील क्षमता, व शेती सिंचनाच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांसोबत आमदार सुहास कांदे यांची आढावा बैठक संपन्न.

  तालुक्यात दोनशेच्या वर पाझर तलाव बंधारे लहान मोठे धरणे असून त्यातील गाळ काढून आहे त्या...

read more
कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाची इयत्ता १२वी बोर्ड परीक्षेत उज्वल यशाची परंपरा कायम

कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाची इयत्ता १२वी बोर्ड परीक्षेत उज्वल यशाची परंपरा कायम

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाने इयत्ता...

read more
जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर चे दमदार अर्धशतक तर युवराज शर्माचे चार बळी

जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर चे दमदार अर्धशतक तर युवराज शर्माचे चार बळी

  रविवार 04 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट आसोसिएशन...

read more
पिंपरी हवेली येथील प्रतिष्ठित कापूस व्यापारी व समाजसेवक योगेश साहेबराव वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश.

पिंपरी हवेली येथील प्रतिष्ठित कापूस व्यापारी व समाजसेवक योगेश साहेबराव वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश.

  पिंपरी हवेली येथील सोसायटीचे माजी चेअरमन शिवाजी दामू वाघ बाळासाहेब वाघ पिंटू गांगुर्डे संजय...

read more
सिटू संघटनेसह विविध नगरपालिका कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र नगरपालिका कर्मचारी कामगार विकास सेनेत जाहीर प्रवेश

सिटू संघटनेसह विविध नगरपालिका कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र नगरपालिका कर्मचारी कामगार विकास सेनेत जाहीर प्रवेश

  "मनमाड शहरात कामगार भवन बांधणार : आमदार सुहास अण्णा कांदे." नांदगाव येथील आमदार निवासस्थानी...

read more
जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर शतकवीर तर मयंक भालेरावची अर्धशतकीय खेळी

जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर शतकवीर तर मयंक भालेरावची अर्धशतकीय खेळी

  गुरुवार 01 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट आसोसिएशन...

read more
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंडर 16 जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकरची शतकीय खेळी हा – जिल्हास्तरीय सामण्यात पहिले शतक

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंडर 16 जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकरची शतकीय खेळी हा – जिल्हास्तरीय सामण्यात पहिले शतक

  गुरुवार 1 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट असोसिएशन...

read more
.