Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती च्या अनुषंगाने मनमाड शहरातून जाणाऱ्या राज्य महामार्गावरील वाहतुकीत बदल

Apr 13, 2022

कोविड- २०१९ नियम शिथील झाल्याने चालू वर्षी सन २०२२ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मोठया प्रमाणात जल्लोशाने साजरा होणार आहे. त्या अनुषंगाने मनमाड शहरामध्ये साधारणत: एकूण ४० चित्ररथ मिरवणुका निघनार असून त्यामुळे सायंकाळचे वेळेत मनमाड शहरातुन गेलेला मालेगांव – मनमाड -अहमदनगर या राज्य मार्गावर येवुन पुढे नगीना मजिद–तुफान चौक मार्गाने डॉ.बाबासाहेब पुतळा येथे समाप्त होते. प्रत्येक मिरवणुकीमध्ये ३०० ते ४०० जनसमुदाय सहभागी होत असतो. त्या अनुषंगाने महामार्गावर मोठया प्रमाणात मिरवणुकांमध्ये मोठया प्रमाणात गर्दी होवुन वाहतुकीस अडथळा निर्माण होत असतो. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होवु नये या करिता मालेगांव — मनमाड –अहमदनगर या राज्य मार्गावरील वाहतुक दि. १४/४/२०२२ रोजी १५.०० वा. पासून ते मिरवणुका संपे पावेतो वाहतुक खालील मार्गाने वळविण्यात आली असल्याचे मा.सचिन पाटील ,पोलिस अधीक्षक ,नाशिक ग्रामीण यांनी कळविले असून पुढील प्रमाणे वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे.

१) येवला बाजुकडुन मनमाड मार्गे मालेगांवकडे जाणारी वाहने मनमाड मार्गे न जाता वळवुन येवला–विंचुर–लासलगांव-चांदवडमार्गे मालेगांव या मार्गाने जातील.
२) मालेगांव कडुन मनमाड मार्गे येवला कडे जाणारी वाहने मनमाड मार्गे न जाता वळवुन चांदवड-लासलगांव-विंचुर- येवला मार्गाने जातील.

 

अजून बातम्या वाचा..

१ जुलै पासून केंद्राने लागु केलेल्या कायद्याची पोलिस स्टेशनला अमलबजावणी गुन्हेगारांना बसणार जरब

१ जुलै पासून केंद्राने लागु केलेल्या कायद्याची पोलिस स्टेशनला अमलबजावणी गुन्हेगारांना बसणार जरब

  नांदगांव : मारुती जगधने इंग्रज काळातील कायद्यात केंद्र शासनाने बदल केला असून गत ७५ वर्षाहुन...

read more
राज्यात ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करणार  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा

राज्यात ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा

मुंबई, दि. २९: राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचे दर्शन घडविण्यासाठी मुख्यमंत्री...

read more
मिशन विधानसभा – मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची अर्थमंत्री अजित पवारांकडून घोषणा

मिशन विधानसभा – मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची अर्थमंत्री अजित पवारांकडून घोषणा

मुंबई, 28 जून : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी राज्याचे अर्थमंत्री...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]