मनमाड शहरातील सेवाभावी कार्यात अग्रेसर असणारी संस्था आनंद सेवा केंद्रातर्फे भगवान महावीर कल्याणक उत्सव निमित्ताने महावीर भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबीरात मनमाड शहरातील १७१ रक्तदात्यांनी आपले योगदान देत शिबिर सफल केले. आनंद सेवा केंद्राचे अध्यक्ष कल्पेश बेदमुथा ,योगेश भंडारी,विनय सोनवणे, मोन्टी शर्मा ,राकेश ललवाणी,अमोल देव,ललित धांदल,नितीन अहिरराव,संदेश बेदमुथा आदींसह सदस्यांनी शिबिर यशस्विततेसाठी परिश्रम घेतले.अर्पण रक्तपेढी नाशिक यांनी रक्तसंकलन केले.
भाद्रपद महागणेशोत्सव ➖2024 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) व श्री सत्यविनायक महापूजा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन
मनमाड - आम्ही परंपरा पाळतो... आम्ही संस्कृती चे रक्षण करतो.... हे ब्रीद घेऊन मनमाड शहरात धार्मिक...











