Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे पोषण पंधरवडानिमित्त जनजागृती

Apr 16, 2022


महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय मनमाड यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून मनमाड येथील अंगणवाडी क्र. ८१ मध्ये पोषण पंधरवडानिमित्त प्राचार्य डॉ.ए. व्हि.पाटील व उपप्राचार्य डॉ.पी.जी.आंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवक व स्वयंसेविकामार्फत जनजागृती करण्यात आली. या कार्यक्रमाद्वारे अंगणवाडीतील लहान मुले व त्यांच्या आई-वडिलांना संतुलित आहाराबद्दल माहिती व रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आहाराचे महत्त्व अशा विविध बाबी समजून सांगण्यात आल्या. या कार्यक्रमात रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ पी बी परदेशी, प्रा. देसले, डॉ. सारिका गुजराथी यांनी विविध उदाहरणांद्वारे पोषण आहाराचे महत्त्व विशद केले. कार्यक्रमाच्या शेवटी लहान मुलामुलींना चिक्की वाटप करण्यात आले तसेच स्वयंसेवक व स्वयंसेवकांकडून पोषण आहाराचे महत्त्व विषद करणारे पोस्टर बनवून ती अंगणवाडीमध्ये लावण्यात आली. अशाच कार्यक्रमाचे आयोजन मनमाडच्या विविध भागांमध्ये आगामी काळात करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अंगणवाडीच्या सेविका मनीषा वाघ, सीमा चौधरी, रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ गणेश गांगुर्डे, प्रा. वर्षाराणी पेडेकर यांचे विशेष सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश महाले व कांचन बर्डे यांनी केले.

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे आयोजित संघटन पर्व 2024-25 अंतर्गत भाजपा सदस्य नोंदणी अभियानाला उस्फुर्त प्रतिसाद

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे आयोजित संघटन पर्व 2024-25 अंतर्गत भाजपा सदस्य नोंदणी अभियानाला उस्फुर्त प्रतिसाद

विश्वातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असणाऱ्या भाजपा च्या संघटन पर्व 24-25 अंतर्गत मनमाड शहर भाजपा...

read more
के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर. मुख्याध्यापक दीपक व्यवहारे. उपप्राचार्य...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]