loader image
[ays_poll id=7]

रसिकलाल धारिवाल हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर चे नामदार भुजबळ यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

Apr 18, 2022


जगभरात धर्माच्या नावाखाली भांडणे आणि युद्ध सुरू आहे. त्यामुळे सगळीकडे द्वेष पसरत असून जागतिक शांतता भंग होत आहे. भगवान महावीर यांनी जगाला शांतता आणि सत्याचा मार्ग अवलंबावा अशी शिकवण दिली. भगवान महावीरांचा अहिंसेचा संदेश जर जगाने स्वीकारला तर जगभरात कुठेही भांडण होणार नाही जागतिक शांततेसाठी त्यांचे विचार अतिशय उपयुक्त आहेत असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

नाशिक शहरातील पंचवटी परिसरात महावीर जैन धर्मार्थ दवाखाना संचलित श्री.रसिकलाल एम.धारिवाल हॉस्पिटल व रिसर्च सेंटर उदघाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी आचार्य श्री पुलकसागरजी महाराज,शोभाताई धारीवाल,जान्हवी धारीवाल, रमणलाल लुंकड,सोहनलाल भंडारी, माजी महापौर रंजना भानसी, नंदलाल पारख, डॉ.एन. पी. छाजेड, मदनलाल साखला, विलास शहा, राजेंद्र जैन, डॉ.प्रशांत छाजेड, रमेश फिरोदिया, पुनीत बालन, प्रमोद दुगड, सतीश पारख, दिपक बागड, सुजाता सराफ, बाबूभाई संचेती, सुमेरकुमार काले, निर्मलभाई गोदा, मोहनलाल चोपडा, राजमल भंडारी, विलासभाई शहा, सोनल, दगडे,मंगलचंद साखला, कांतीलाल साखला, पोपटलाल सुराणा, किसनलाल सारडा यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, स्व. हुकूमचंद बागमर यांनी नाशिक शहर आणि समाजासाठी मोठं योगदान दिलं. चांगलं काम करतांना अनेक अडचणी येतात मात्र ते डगमगले नाही. सामाजिक कार्याचा आदर्श त्यांनी निर्माण केला. अतिशय चांगलं हॉस्पिटल नाशिकमध्ये उभं राहिलं आहे.रुग्णसेवेसाठी सारखी दुसरी कुठलीच सेवा नाही. मानवतेचा धर्म या ठिकाणी निभावला जाणार आहे. बॉर्डरवर लढणारा सैनिक जेवढा महत्वाचा आहे तेवढाच कोरोनात रुग्णांचा जीव वाचविणारा डॉक्टर महत्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, देशात द्वेषाचे वातावरण निर्माण केलं जातं असून हे भक्तीच राजकारण नसून शक्तीच राजकारण आहे. लोकांना दुःख देणारे आणि अशांतता निर्माण करणारं राजकारण सद्या देशभरात सुरू आहे. शांततेचा मार्ग अवलंबिला तर त्यात सर्वांचे सुख आहे असे सांगत पर्यावरणाचा ऱ्हास झाला तर आरोग्याच्या अनेक समस्या वाढणार आहे. त्यामुळे पर्यावरणाचा संतुलन राहण्यासाठी आपल्याला काम करावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.


अजून बातम्या वाचा..

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

. मनमाड भाजपा तर्फे आनंद जल्लोष कार्यक्रम शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्को च्या...

read more
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून “मराठा लष्करी भूप्रदेश” म्हणून मानांकन

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून “मराठा लष्करी भूप्रदेश” म्हणून मानांकन

*छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून "मराठा लष्करी भूप्रदेश" म्हणून मानांकन...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय  लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय   निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय  निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना...

read more
नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची विधानसभेत जोरदार मागणी

नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची विधानसभेत जोरदार मागणी

नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची...

read more
.