loader image
[ays_poll id=7]

पेट्रोल पंपावरील पाटी बनलीय चर्चेचा विषय !

Apr 22, 2022


पाट्या म्हटलं की पुण्याची आठवण येते. पुणेरी पाट्या या राज्यभरातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहेत. मात्र, अहमदनगर शहरातील नेवासकर पेट्रोल पंपावर लावण्यात आलेली एक पाटी सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय बनली आहे. ‘पेट्रोलचे दर स्वत:च्या जबाबदारीवर पाहावेत, छातीत कळ आल्यास पंप मालक जबाबदार नाही,’ अशी पाटी पंपावर लिहिण्यात आली आहे. या पाटीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्याला हजारो लाईक्स आणि शेअर्स मिळाले आहेत. अहमदनगरमध्ये आज पेट्रोलचा दर 120 रुपये प्रति लिटर इतका आहे.

पेट्रोल पंपावरील कर्मचारी रसिकलाल बोरा यांनी हा बोर्ड लिहिला आहे. मागील अनेक वर्षांपासून ते पंपावर दररोज वेगवेगळे बोर्ड लिहितात. कधी सुविचार तर कधी चारोळी ते लिहितात. यातून पंपावर येणाऱ्या नागरिकांचे मनोरंजन तर होतेच, पण कधी कधी त्यांच्या जीवनाला एखाद्या सुविचाराने कलाटणी मिळते, असं बोरा यांनी म्हटलं आहे. दरम्यान, देशात महागाईनं उच्चांक गाठला आहे. इंधन दर गगनाला भिडले आहेत. पेट्रोल आणि डिझेलने कधीच शंभरी पार केली आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या खिशावर भार पडत आहे. देशात सध्या सर्वात स्वस्त पेट्रोल पोर्टब्‍लेयरमध्ये विकलं जात आहे. तर सर्वात महाग पेट्रोल महाराष्ट्रात मिळत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्याने त्याचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या दरांवरही झालेला आहे.


अजून बातम्या वाचा..

व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

मनमाड -- मनमाड शहर व्यापारी महासंघ चे अध्यक्ष राजाभाऊ पारीक तसेच त्यांचे लहान बंधू अनिल पारीक व...

read more
एक दिवशीय जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महामानव फॉउंडेशन,मालेगाव संघ विजेता.

एक दिवशीय जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महामानव फॉउंडेशन,मालेगाव संघ विजेता.

  मनमाड:-एम.एस.स्पोर्ट्स,मनमाड आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे क्रिडांगण,मनमाड...

read more
मनमाडमधील धाडसी घरफोडी करणारे तीन सराईत गुन्हेगार अटकेत, १ कोटी ५ लाखांचा माल जप्त

मनमाडमधील धाडसी घरफोडी करणारे तीन सराईत गुन्हेगार अटकेत, १ कोटी ५ लाखांचा माल जप्त

मनमाड : मनमाड शहरातील डमरे कॉलनी परिसरातील व्यावसायिक मुर्तजा अब्दुल हुसेन रस्सीवाला यांच्या घरात...

read more
.