Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयात जागतिक वसुंधरा दिन साजरा

Apr 22, 2022

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे आज दि.22 एप्रिल 2022 रोजी ऑनलाइन वेबिनार चे आयोजन करून जागतिक वसुंधरा दिन निमित्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला.याप्रसंगी स्वामी विवेकानंद नाईट कॉलेज आर्ट्स अँड कॉमर्स डोंबिवली पश्चिम मुंबई येथील भूगोल विभागाचे डॉ. सुमंत एकनाथ औताडे हे प्रमुख वक्ते होते. त्यांनी आपल्या मनोगतातून वसुंधरा दिन हा पर्यावरण विषयक कार्यक्रमात पाठबळ देण्याचा पाया आहे. त्यामुळे पर्यावरण संवर्धनाच्या सार्वजनिक वचनबद्धतेला पुन्हा एकदा संजीवनी मिळते. हा दिन साजरा करण्यामुळे पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने सामाजिक चालना मिळते. वसुंधरा दिन हा जगातील सर्वात मोठा कार्यक्रम आहे. भिन्न पार्श्वभूमी, श्रद्धा, विश्वास आणि राष्ट्रीयत्व असलेले जगभरातील सर्व लोक हा दिन साजरा करतात. या कार्यक्रमात दरवर्षी एक अब्जाहून अधिक लोक सहभागी होतात व यातून सामाजिक विकास आणि पर्यावरण संरक्षण कार्यक्रमाद्वारे काम करणाऱ्या हजारो कार्यकर्त्यांची वर्षभर समन्वय साधला जातो . जागतिक पातळीवर पर्यावरणवादी कार्यकर्त्यांना एकत्र जोडणाऱ्या अर्थ डे नेटवर्क(EDN) या आंतरराष्ट्रीय संघटनेने वसुंधरा दिनाच्या वाटचालीचा आढावा आपल्या संकेतस्थळावरून प्रसिद्ध केला आहे. आपण प्रत्येकाने नैसर्गिक साधन संपत्तीचे संरक्षण केले पाहिजे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पृथ्वीचे संरक्षण केले पाहिजे जसे आपण आपले घर सुंदर ठेवण्याचा प्रयत्न करतो त्याच पद्धतीने आपली पृथ्वी देखील सुंदर ठेवावी इत्यादी विचार त्यांनी मांडले.

आपल्या अध्यक्षीय मनोगतातून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अरुण पाटील यांनी वसुंधरा दिनानिमित्त पृथ्वीवरील हवा पाणी आणि जंगल संपत्ती जमीन भौगोलिक प्रणाली अवकाश तंत्रज्ञान याचा वापर व पर्यावरणाचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भूगोल विभागाचे विभाग प्रमुख प्रा सुरेश पगार यांनी केले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून निमगाव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुभाष निकम व म.स.गा महाविद्यालय येथील उपप्राचार्य डॉ. सी. एम. निकम होते. याप्रसंगी मनमाड महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रमोद आंबेकर सर, महाविद्यालयाचे कुलसचिव श्री समाधान केदारे, कार्यालयीन अधिक्षक एकनाथ आहिरे, महाविद्यालयातील प्राध्यापक प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. गणेश माधव गांगुर्डे यांनी केले पाहुण्यांचा परिचय प्रा. कॅप्टन प्रकाश बर्डे यांनी केला व कार्यक्रमाचे आभार प्रा. देविदास सोनवणे यांनी केले

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे आयोजित संघटन पर्व 2024-25 अंतर्गत भाजपा सदस्य नोंदणी अभियानाला उस्फुर्त प्रतिसाद

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे आयोजित संघटन पर्व 2024-25 अंतर्गत भाजपा सदस्य नोंदणी अभियानाला उस्फुर्त प्रतिसाद

विश्वातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असणाऱ्या भाजपा च्या संघटन पर्व 24-25 अंतर्गत मनमाड शहर भाजपा...

read more
के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर. मुख्याध्यापक दीपक व्यवहारे. उपप्राचार्य...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]