Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

राष्ट्रसंत सुधारकांच्या जैव-विचार नात्यांची वीण गुंफत रंगला आंबेडकरी शाहिरी जलसा

Apr 23, 2022

विश्वरत्न बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीच्या निमित्ताने भीमनगर चिचोंडी बु येथें शहीद मेजर नारायण भाऊ मढवई मंचावर प्रबुद्ध लोककला विद्यापीठ निर्मित शरद शेजवळ सर प्रस्तुत राजा शिव,फुले, शाहू, आंबेडकर विचारधारेवर आधारित सामाजिक प्रबोधनात्मक गीतांचा आंबेडकरी शाहिरी जलशाचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी शहीद मेजर नारायण भाऊ मढवई यांचे वडील वीरपिता निवृत्तीदादा मढवई आणि बंधू बाळूअण्णा मढवई यांच्या हस्ते
तथागत भगवान बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून आणि शहीद मेजर नारायणभाऊ मढवई यांच्या प्रतिमांना अभिवादन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी शहीद मेजर नारायणभाऊ यांना मानवंदना देताना गायक शरद शेजवळ सर,ऍड आरतीताई खरात,जितेंद्र पाटील यांनी
दिल दिया है,जान भी देंगे, ए वतन तेरे लिए या देशभक्ती गीताने आंबेडकरी शाहिरी जलसास सुरुवात झाली.
त्यानंतर लोककवी वामनदादा कर्डक यांची रचना शरद शेजवळ सर यांनी तुझ्या हाती तूप आल,तुझ्या हाती साय पण लुटली जाते येथे बहिण कधी लुटली जाते माय….. पण समाजाचे काय रे गड्या……समाजाचे काय सद्याच्या सामाजिक परिस्थितीवर प्रकाश टाकण्याचे काम या गीतातून करण्यात आले. तर बाबासाहेबांची लेखणी कशी होती हे गीतातून मांडताना जगातली देखणी बाई मी भिमाची लेखणी या गीतातून बाबासाहेबांच्या कार्यकर्तृत्वाची ओळख गायिका ऍड आरतीताई खरात यांनी करून दिली.
महात्मा फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी दिलेले योगदान आणि त्यामुळे आजच्या मुलींची किती प्रगती झाली या आशयाचे गीत रचना सादर करण्यात आली
फुल्यांनी जर शिकवले नसते सावित्रीबाईला…..तर असे सुखाचे दिवस आलेच नसते हर एक बाईला या गीतातून गायक शरद शेजवळ सर यांनी महात्मा फुले यांनी महिलांसाठी केलेले कार्य किती अनन्यसाधारण आहेत हे पटवून दिले.
त्याच बरोबर या देशात शिवराय आणि भीमराय यांनी केलेल्या कार्याची ओळख करून देताना या दोन्हीही महापुरुषांच्या कार्यकर्तृत्वाची महती सांगणारे गीत सादर झाले दोनच राजे इथे जन्मले त्या कोकण पुण्यभूमीवर….
एक त्या रायगडावर….. एक त्या चवदार तळ्यावर या गीतातून या महापुरुषांच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख मांडण्यात आला.
रमाईने बाबासाहेबाना संपूर्ण आयुष्यभर साथ दिली आणि कोणतीही कुणकुण न करता संसार सांभाळला.रमाईच्या जीवन प्रवास माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लावील रमान आणि रमामाईला घेऊन जोडीत भीम बसला व रथाच्या जोडीला, नांदन नांदन माझ्या रमाच नांदन भीमाच्या संसारी जस टिपूर चांदण ही गीत रचना ऍड आरतीताई खरात यांनी सादर केल्या,
त्याच बरोबर राजा राणीच्या जोडीला, गावामध्ये गाव आहे ते महू गाव येथे जन्मले भीमराव या गीत रचना जितेंद्र पाटील यांनी सादर केले. त्याच बरोबर माझी आज्जी म्हणायची ओवी ही जात्यावर भीम बनला सावली कोटी कोटीच्या माथ्यावर ही गीत रचना रवींद्र गोंडाअंबे यांनी सादर केली
त्याच बरोबर गावातील बाल गायिका साक्षि केशव गुंजाळ हिने कुहू कुहू मंजुळ वाणी,भीमा तुझी मंजुळ वाणी ही गीत रचना सादर केली तर बाल गायक मनोज बाळू गुंजाळ याने जागं असावं शिव भिवाच पिल्लू जागं असावं आणि प्रेम सोनवणे याने जसा गुलाब फुलतो या त्या सुगंधी
जाईला,भीम आवडीने बोले रामू रामू रमाईला या गीत रचनेने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले अशाप्रकारे एका पेक्षा एक अनेक प्रबोधनात्मक गीत रचना सादर करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील अनेक गीतांच्या प्रसंगाचे वर्णन करणाऱ्या गीतामुळे श्रोते मंत्रमुग्ध झाले यावेळी विजय भोंडगे (ढोलकी) अक्षय भोंडगे (तालवाद्य) सतीश सोळसे (की बोर्ड) सिध्दार्थ गुंजाळ आणि संकेत गुंजाळ यांची साथ संगत लाभली. यावेळी सर्व कलावंतांचे शाल, गुलाब पुष्प आणि बाबासाहेबांचा ग्रंथ देऊन उत्सव समितीच्या वतीने सन्मान करण्यात आला. शेवटी *जहाँ डाल डाल पर सोने की चिडिया करती है बसेरा.......वो भारत देश है मेरा* या गीतानंतर शहीद मेजर नारायणभाऊ यांना मूक श्रद्धांजली देऊन शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.याप्रसंगी मोठ्या प्रमाणात महिला,पुरुष ग्रामस्थ प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन मिलिंद गुंजाळ सर यांनी केले यावेळी पंचक्रोशीतील शेकडो नागरिक कार्यक्रमास उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

भाद्रपद महागणेशोत्सव ➖2024 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) व श्री सत्यविनायक महापूजा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

भाद्रपद महागणेशोत्सव ➖2024 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) व श्री सत्यविनायक महापूजा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड - आम्ही परंपरा पाळतो... आम्ही संस्कृती चे रक्षण करतो.... हे ब्रीद घेऊन मनमाड शहरात धार्मिक...

read more
मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा तृप्ती पाराशर आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा तृप्ती पाराशर आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

सुवा फिजी येथे १४ ते २१ सप्टेंबर २०१४ रोजी होणाऱ्या कॉमनवेल्थ चँपियनशिप साठी महाराष्ट्रातील एकमेव...

read more
मनमाड शहर भाजपा तर्फे आरक्षण विरोधी राहुल गांधी व हिंदू विरोधी शरद पवार यांचे विरोधात जोरदार घोषणा बाजी करीत निषेध आंदोलन

मनमाड शहर भाजपा तर्फे आरक्षण विरोधी राहुल गांधी व हिंदू विरोधी शरद पवार यांचे विरोधात जोरदार घोषणा बाजी करीत निषेध आंदोलन

राहुल गांधी यांनी अमेरिकेतील एका मुलाखती दरम्यान काँग्रेस भारतात सत्तेत आल्यास आरक्षण काढून टाकू...

read more
कासलीवाल स्कूलमध्ये माता पालकांसाठी कुकिंग बॅटल (कुकिंग विदाऊट फ्लेम्स ) स्पर्धेचे आयोजन…..

कासलीवाल स्कूलमध्ये माता पालकांसाठी कुकिंग बॅटल (कुकिंग विदाऊट फ्लेम्स ) स्पर्धेचे आयोजन…..

नांदगांव : दि १३ मारुती जगधने दि.13 सप्टेंबर 2024 नांदगाव येथील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडियम...

read more
लायन्स क्लब ऑफ मनमाड प्राइड व लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये कर्करोग (कॅन्सर) जनजागृती कार्यक्रम संपन्न.

लायन्स क्लब ऑफ मनमाड प्राइड व लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये कर्करोग (कॅन्सर) जनजागृती कार्यक्रम संपन्न.

  मनमाड :-लायन्स क्लब ऑफ मनमाड प्राइड,लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी व कॅन्सर सेंटर अमेरिका (CCA)...

read more
मनमाड महाविद्यालयाच्या रासेयो स्वयंसेवकांची जिल्हास्तरीय विविध स्पर्धे मध्ये यश

मनमाड महाविद्यालयाच्या रासेयो स्वयंसेवकांची जिल्हास्तरीय विविध स्पर्धे मध्ये यश

मनमाड महाविद्यालयाच्या रासेयो स्वयंसेवकांची जिल्हास्तरीय विविध स्पर्धे मध्ये यश महात्मा गांधी...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]