loader image
[ays_poll id=7]

एलॉन मस्क ट्विटरचे नवे मालक; ४४ अब्ज डॉलरचा करार

Apr 26, 2022

टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनी ट्विटर कंपनी विकत घेतली आहे. ४४ अब्ज डॉलरमध्ये हा करार पार पडला आहे. एलॉन मस्क सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. त्यांनी ट्विटरमध्ये गुंतवणूक केल्यानंतर ट्विटर विकत घेण्याची इच्छा व्यक्त केली होती.

मस्क यांनी प्रति शेअर ५४.२० डॉलर या दराने ट्विटर विकत घेण्याची ऑफर दिली होती. ट्विटरच्या बोर्डाने सोमवारी रात्री उशिरा ही ऑफर स्वीकारली आहे. ट्विटरवरून माहिती देताना टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनी अखेर ट्विटर विकत घेतल्याची पुष्टी केली आहे.

कंपनीने सांगितले आहे की मस्क यांनी ट्विटर विकत घेण्यासाठी ४४ अब्ज डॉलरचा करार केला आहे. दरम्यान, टेस्लाचे मालक एलॉन मस्क यांचे आणखी एक ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

त्यासंदर्भात ट्विटरसोबतचा त्यांचा करार अंतिम होण्याची शक्यता होती. सोमवारी संध्याकाळी मस्क यांनी ट्विट केले. या ट्विटमध्ये लिहीले होते की, ‘मला आशा आहे की त्यांच्या सर्वात वाईट टीका अजूनही ट्विटरवर राहतील, कारण यालाच बोलण्याचं स्वातंत्र्य म्हणतात.’ त्यांचे हे ट्विट वेगाने व्हायरल झाले.

एलॉन मस्क मागील काही काळापासून सतत ट्विटरचे शेअर्स खरेदी करत होते. त्यानंतर त्यांनी थेट ट्विटरच्या संचालक मंडळाकडून ट्विटर विकत घेण्याची ऑफर दिली. एलॉन मस्क यांनी प्रति शेअर ५४.२० डॉलर दराने ट्विटर विकत घेण्याचा प्रस्ताव ठेवला होता.

सध्या, हा आकडा १ एप्रिल २०२२ च्या स्टॉकच्या बंद दरापेक्षा ३८ टक्के अधिक आहे. त्यावेळी, ट्विटरमध्ये गुंतवणूक केलेले सौदी अरेबियाचे प्रिन्स अल वलीद बिन तलाल अल सौद यांनी ट्विट करून एलॉन मस्क यांची ऑफर नाकारली होती.

अजून बातम्या वाचा..

भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन

भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या...

read more
रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक तर्फे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर अनकाई येथे संपन्न

रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक तर्फे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर अनकाई येथे संपन्न

  दिनांक 17 मंगळवार रोजी अनकाई येथे रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक आणि रोटरी आय हॉस्पिटल मालेगाव...

read more
महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान

महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान

  मनमाड :- महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड,...

read more
व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

मनमाड -- मनमाड शहर व्यापारी महासंघ चे अध्यक्ष राजाभाऊ पारीक तसेच त्यांचे लहान बंधू अनिल पारीक व...

read more
.