loader image
[ays_poll id=7]

राज्यामुळे पेट्रोल डिझेल चे दर वाढले ही वस्तुस्थिती नाही : मुख्यमंत्री ठाकरे

Apr 27, 2022

पेट्रोल-डिझेलचे दर राज्य सरकारमुळे चढेच राहिल्याचे पंतप्रधानांनी कोविड विषयक बैठकीतसांगितले.मात्र,महाराष्ट्रासारख्या देशाच्या विकासात सर्वात मोठे योगदान देणाऱ्या राज्याला आर्थिक बाबतीत सापत्न वागणूक दिली जात असल्याबाबत मुख्यमंत्री उद्धवठाकरे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली.
आज मुंबईत एक लिटर डिझेलच्या दरामध्ये २४ रुपये ३८ पैसे केंद्राचा तर २२ रुपये ३७ पैसे राज्याचा कर वाटा आहे. पेट्रोलच्या दरात ३१ रुपये ५८ पैसे केंद्रीय कर तर ३२ रुपये ५५ पैसे राज्याचा कर आहे. त्यामुळे राज्यामुळे पेट्रोल-डिझेल महागले आहे, ही वस्तुस्थिती नाही.
संपूर्ण देशात सर्वात जास्त जीएसटी महाराष्ट्रातून गोळा होतो. थेट कर ३८.३ टक्के आणि जीएसटी १५ टक्के असे दोन्ही कर एकत्र केले तर महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावरील राज्य आहे. असे असूनही आजही राज्याला सुमारे २६,५०० कोटी रुपये जीएसटी थकबाकीपोटी मिळणे बाकी आहे.
राज्यातील आपत्तीवेळी एनडीआरएफ चे तोकडे निकष वाढवून आपत्तीग्रस्तांना मदत करण्याची मागणी राज्य सरकार वारंवार केंद्राकडे करीत आले आहे. मात्र, केंद्राने यावर काहीही पावले उचलली नाहीत. उलटपक्षी राज्याने विविध आपत्तीत निकषापेक्षा जास्त मदत करून दिलासा दिला आहे.

अजून बातम्या वाचा..

ग्रंथालयांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

ग्रंथालयांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

  पुणे - जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ग्रंथालयांना अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी, शासन प्रयत्न...

read more
आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर साईराज राजेश परदेशी यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार जाहीर

आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर साईराज राजेश परदेशी यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार जाहीर

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धांमध्ये सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मनमाड...

read more
मनमाड येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध.

मनमाड येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध.

मनमाड, दि. २५ एप्रिल २०२५: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा...

read more
पहलगाम घटनेचा मनमाड क्रिकेट प्रीमियर लीग च्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला

पहलगाम घटनेचा मनमाड क्रिकेट प्रीमियर लीग च्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला

दिनांक २२/०४/२०२५ रोजी जम्मू काश्मीर राज्यातील पहलगाममधिल बैसरण येथे विदेश.देशभरातिल राज्यातून...

read more
.