आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षांपासून मतदार संघातील प्रत्येक गरजवंतास रेशन कार्ड संबंधी अडचणी सोडवून व नवीन रेशन कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी मेहनत घेतली जात आहे.
निरंतर रेशन कार्ड उपलब्ध करून देण्याच्या मालिकेत आज साकोरा येथील लांबडी कोकण वाडा वस्तीवरील आदिवासी बांधवांना रेशन कार्डचे वाटप करण्यात आले.
लांबडी कोकण वाडा वस्तीवरील आदिवासी बांधवांना आज पर्यंत स्वतःचे रेशन कार्ड नव्हते आणि म्हणूनच संबंधित आदिवासी बांधव अनेक सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी ते असमर्थ होते आज तीस कुटुंबांना रेशन कार्ड उपलब्ध करून देण्यात आले.
याप्रसंगी शिवसेना संघटक बाबुराव बागुल, एनके राठोड साहेब, युवा सेना तालुका प्रमुख सागर हिरे, दीपक शेलार, प्रमोद चव्हाण,भाऊसाहेब चव्हाण उपस्थित होते.
पोषण पखवाड्या माध्यमातुन केली जात आहे लेक लाडकी योजनेची जनजागृती
बाल विकास प्रकल्प अधकारी (नागरी)नाशिक जिल्हा नाशिक मनमाड विभाग येथे दिनांक ९ मार्च २४ रोजी प्रकल्प...











