Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळा :नांदगाव नगरपरिषद प्रशासन करीत आहे अक्षम्य दिरंगाई, अखिल भारतीय मराठा महासंघाचा आरोप

May 6, 2022

लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा नांदगाव शहरात नियोजित ठिकाणी येथे ३१ मे रोजी जयंती दिनाचे औचित्य साधून उभारणे कामी मराठा महासंघ शर्थीचे प्रयत्न करीत आहे परंतु नांदगाव नगर परिषदेच्या प्रशासनाच्या अक्षम्य दिरंगाई मुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा ३१ मे रोजी उभारण्यात अनेक अडथळे निर्माण होत असून खरं तर ज्या दिवशी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा नांदगाव शहरात मराठा महासंघ स्वखर्चाने उभारणार या बातमीने आणि त्याच्या मनात शंका निर्माण झाल्या होत्या मूर्तीसाठी लाख रुपयांचा खर्च मराठा महासंघ करू शकेल काय असे अनेक प्रश्न निर्माण झाले होते परंतु मराठा महासंघ आर्थिक सक्षम असल्याने आर्थिक अडचण निर्माण झाली नाही अशा अनेक अडथळ्यांवर मात करून शेवटी शासनाच्या निष्कर्षा प्रमाणे मराठा महासंघाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा आकर्षक पुतळा सर्व समाज बांधवांच्या साक्षीने प्रदर्शित केला आणि सर्वांनीच दर्शन घेऊन समाधान व्यक्त केले या उपरोक्त मराठा महासंघाने शासन परवानगीसाठी दिनांक २२/०४/२०२२ रोजी नांदगाव नगर परिषदेकडे ना हरकत पत्र,एन ओ सी ,मागील मंजूर ठराव,लोकेशन प्लॅन,प्लॅन आराखडा व जागेची माहिती व इतर अनुषंगिक दस्तऐवज मागितले असता दिनांक २५/०४/२०२२ रोजी नांदगाव नगरपरिषदेने पत्राद्वारे कळविले की कला संचालनालयाची मान्यता असल्याचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतरच एनओसी देता येईल अशी शर्थ घालून एनओसी स्थगित केली वास्तविक शासन निर्णयामध्ये कोठेही उल्लेख नसतांना विनंती अर्ज देऊन आज चौदा दिवस उलटून गेल्यानंतरही अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही शेवटी नाईलाजास्तव आम्ही माहितीच्या अधिकाराचा वापर करीत माहिती मागितली आहे तदनुषंगाने तरी माहिती मिळेल असे अपेक्षित आहे या विषयासंदर्भात मराठा महासंघ सातत्याने नांदगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी माननीय श्री विवेक धांडे साहेब यांच्याशी वारंवार संपर्क करून माहिती मिळविण्याचा प्रयत्न करीत आहोत पुतळा उभारण्याच्या परवानगीसाठी शासन निर्णयाप्रमाणे किमान एक वर्षाच्या आतील मंजूर ठरावाची आवश्यकता आहे परंतु नांदगाव नगर परिषदेत सध्या प्रशासकीय राजवट असल्याने आम्ही प्रशासकीय ठरावाची दिनांक ४/०५/२०२२ रोजी च्या पत्रान्वये मागणी केली असता नांदगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी माननीय श्री विवेक धांडे यांनी आम्हाला खात्रीपूर्वक सांगितले की जनमत चाचणी घेऊन मी सदर प्रशासकीय ठराव आपणास लवकरच देण्याचा प्रयत्न करतो सदर प्रशासकीय ठरावाच्या अनुषंगाने आम्ही त्यांची पुन्हा भेट घेतली असता जनमत चाचणी घेऊन प्रशासकीय ठराव करून देण्यास त्यांनी असमर्थता दर्शविली आहे या संपूर्ण घटनाक्रमावरून नांदगाव नगर परिषद प्रशासन प्रचंड दबावाखाली काम करीत असल्याने प्रशासकीय ठराव व इतर अनुषंगिक दस्तऐवज मिळण्यात अनंत अडचणी निर्माण होत आहे मराठा महासंघ या विषयात कोणत्याही श्रेयवाद भूमिकेत नसून पुतळा विराजमान व्हावा या एकमेव प्रामाणिक उद्देशाने मराठा महासंघ शर्थीचे प्रयत्न सुरूच ठेवणार आहे आम्ही सर्वांकडे यापूर्वीच मदतीची मागणी केलेली आहे मराठा महासंघ या विषयात सर्वांच्यात मदतीचे स्वागत करीत आहे आपल्या सर्वांच्या शुभेच्छा ना प्रयत्नांना निश्चित यश मिळेल अशी पुण्यश्लोक अहिल्यादेवी चरणी प्रार्थना करतो असे पत्रक भिमराज लोखंडे, अध्यक्ष अखिल भारतीय मराठा महासंघ नांदगाव तालुका यांनी प्रसिध्दीस दिले आहे.

अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील साक्षी शुक्ला, आर्या साळुंखे , सुहानी बोरा व भाविका कौरानी नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन अंडर 19 महिला संघात सामील

भुमी क्रिकेट अकॅडमीतील साक्षी शुक्ला, आर्या साळुंखे , सुहानी बोरा व भाविका कौरानी नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन अंडर 19 महिला संघात सामील

महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी ( जिल्हास्तरीय सामने ) नंदुरबार...

read more
भारतीताई पवार यांना सर्वाधिक मते आपल्या मतदारसंघातून मिळवून द्यायची असल्याचा निर्धार करा : आमदार सुहास (आण्णा) कांदे

भारतीताई पवार यांना सर्वाधिक मते आपल्या मतदारसंघातून मिळवून द्यायची असल्याचा निर्धार करा : आमदार सुहास (आण्णा) कांदे

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या वतीने मतदार संघातील जिल्हा परिषद...

read more
गौरवास्पद – मनमाड शहरातील ख्यातनाम डॉक्टर कुलकर्णी दाम्पत्यांचे चिरंजीव आणि मनमाड चे भूमिपुत्र डॉ.तन्मय संदीप कुलकर्णी बजावणार पुण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटल मध्ये वैद्यकीय सेवा

गौरवास्पद – मनमाड शहरातील ख्यातनाम डॉक्टर कुलकर्णी दाम्पत्यांचे चिरंजीव आणि मनमाड चे भूमिपुत्र डॉ.तन्मय संदीप कुलकर्णी बजावणार पुण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटल मध्ये वैद्यकीय सेवा

मनमाड - मनमाड शहरातील सुप्रसिद्ध डॉक्टर संदीप कुलकर्णी यांचे चिरंजीव मनमाड चे भूमिपुत्र डॉ. तन्मय...

read more
मनमाड येथे शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवाला भाविकांचा उस्फूर्त प्रतिसाद.सोहळ्यात श्रवणीय किर्तनांची पर्वणी

मनमाड येथे शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवाला भाविकांचा उस्फूर्त प्रतिसाद.सोहळ्यात श्रवणीय किर्तनांची पर्वणी

  मनमाड : योगेश म्हस्के शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवा निमित्ताने...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]