Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

बोलठाण घाटमाथ्यावरील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गोकुळ शेठ कोठारी यांचा शिवसेनेत प्रवेश

May 9, 2022

रविवार दिनांक ८ मे रोजी सायंकाळी बोलठाण येथील प्रतिष्ठित व्यापारी गोकुळ शेठ कोठारी यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला.
गोकुळ शेठ कोठारी हे भुजबळ यांचे निकटवर्तीय म्हणुन परिचित होते. गेल्या अनेक दिवसांपासून आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या विकासाचा झंझावात बघून कोठारी यांनी शिवसेना पक्षात आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.
या प्रवेश सोहळ्याचे अध्यक्ष स्थानी जेष्ठ नेते बापूसाहेब कवडे होते, प्रमुख अतिथी वैजापूर चे आमदार प्रा.बोरनारे सर तसेच कन्नड चे आमदार उदयसिंग राजपूत हे होते.
घाटमाथ्यावरील राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकदा खिंडार पडले असून याआधी भुजबळ यांचे निकटवर्तीय भाऊसाहेब सूर्यवंशी यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत शिवसेनेत प्रवेश केलेला आहे.
आमदार सुहास आण्णा कांदे यांनी गोकुळ शेठ कोठारी यांचे पक्षात स्वागत केले व या पुढे सर्व मान सन्मान दिला जाईल असा विश्वास बोलून दाखवला, जनतेसाठी काम करा आणि काहीही गरज पडली तर एक आवाज द्या मी हजर राहील असे आश्वासन दिले.
विशेष बाब म्हणजे या प्रवेश सोहळ्यात बोलताना गोकुळ कोठारी यांनी आपल्या भाषणात अनेक वर्षांपासून प्रलंबित बोलठाण ते मनेगाव फाटा या रस्त्याचे नूतनीकरणाच्या विषयाला हात घातला, बोलठाण ही मोठी बाजार पेठ असून औरंगाबाद जिल्ह्यातून अनेक शेतकरी, व्यापारी बोलठाण येथे येत असतात, पण गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची अवस्था दयनीय आहे या मुळे अनेक अपघात होत असतात काही दिवसापर्वीच सोयरिक तुटली, म्हणून कार्यक्रमाला उपस्थित तीनही आमदारांनी हा रस्ता पूर्ण करून देण्याची मागणी त्यांनी केली. यानंतर आ.बोरनारे सर व आ.राजपूत यांनी त्यांच्या हद्दीतील स्वखर्चातून एक एक किलोमीटर चा रस्ता त्वरित सुरू करण्याचे आश्वासन दिले. उर्वरित नांदगाव तालुक्यातील चार किलोमीटर च्या रस्त्याचे काम PWD ने सुरू केले असून आता लवकरच या संपूर्ण रस्त्याचे काम होऊन अनेक वर्षाच्या हाल अपेष्टा थांबणार आहे यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
या प्रसंगी गोकुळ कोठारी, अजीम काझी, फैयाज शेख, विनोद साबळे, मनोज रिंढे, अनिता असावा, ठकुबाई पवार, मुजम्मिल सय्यद, पोपट मोरे तर संतोष गायकवाड जातेगाव यांच्या नेतृत्वात बाळू पवार, सुरेश जाधव, किरण चव्हाण नामदेव करपे कडुबा त्रिभुवन, नंदू मोरे तर चंदनपुरी मधून ईश्वर राठोड यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
घाटमाथ्यावर सुहास आण्णा कांदे यांचा सतत संपर्क,विकासाची कामे आणि जनतेशी त्यांची जोडलेली नाळ आता अनेक पक्षातील लोक शिवसेना पक्षात प्रवेश करत आहेत व प्रवेश करण्यास इच्छुक आहेत.
या कार्यक्रमास शिवसेना तालुका प्रमुख किरण देवरे, नगराध्यक्ष राजेश कवडे, गुलाब भाबड, विलास आहेर, सुनील जाधव, एन.के राठोड, अनिल रिंढे, रफिक पठाण, तेज कवडे, महावीर पारख, विष्णू निकम सर, गुलाब चव्हाण, संजय बोरसे, भाऊसाहेब सूर्यवंशी, गिताराम पवार, अण्णा शिंदे, शशी मोरे, हर्षल पवार प्रकाश शिंदे, चंद्रकांत जाधव, अर्जुन पाटील, दत्तात्रय पाटील, जितेंद्र पाटणी, अनिल कायस्थ, राजेश नवले घाटमाथ्यावरील शिवसेनेचे सरपंच, पदाधिकारी सर्व कोठारी परिवार यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक व नागरिक उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाऊसाहेब सूर्यवंशी यांनी केले तर आभार प्रदर्शन शिवसेना शहर प्रमुख संजय बोरसे यांनी केले.

अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील साक्षी शुक्ला, आर्या साळुंखे , सुहानी बोरा व भाविका कौरानी नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन अंडर 19 महिला संघात सामील

भुमी क्रिकेट अकॅडमीतील साक्षी शुक्ला, आर्या साळुंखे , सुहानी बोरा व भाविका कौरानी नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन अंडर 19 महिला संघात सामील

महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी ( जिल्हास्तरीय सामने ) नंदुरबार...

read more
भारतीताई पवार यांना सर्वाधिक मते आपल्या मतदारसंघातून मिळवून द्यायची असल्याचा निर्धार करा : आमदार सुहास (आण्णा) कांदे

भारतीताई पवार यांना सर्वाधिक मते आपल्या मतदारसंघातून मिळवून द्यायची असल्याचा निर्धार करा : आमदार सुहास (आण्णा) कांदे

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या वतीने मतदार संघातील जिल्हा परिषद...

read more
गौरवास्पद – मनमाड शहरातील ख्यातनाम डॉक्टर कुलकर्णी दाम्पत्यांचे चिरंजीव आणि मनमाड चे भूमिपुत्र डॉ.तन्मय संदीप कुलकर्णी बजावणार पुण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटल मध्ये वैद्यकीय सेवा

गौरवास्पद – मनमाड शहरातील ख्यातनाम डॉक्टर कुलकर्णी दाम्पत्यांचे चिरंजीव आणि मनमाड चे भूमिपुत्र डॉ.तन्मय संदीप कुलकर्णी बजावणार पुण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटल मध्ये वैद्यकीय सेवा

मनमाड - मनमाड शहरातील सुप्रसिद्ध डॉक्टर संदीप कुलकर्णी यांचे चिरंजीव मनमाड चे भूमिपुत्र डॉ. तन्मय...

read more
मनमाड येथे शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवाला भाविकांचा उस्फूर्त प्रतिसाद.सोहळ्यात श्रवणीय किर्तनांची पर्वणी

मनमाड येथे शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवाला भाविकांचा उस्फूर्त प्रतिसाद.सोहळ्यात श्रवणीय किर्तनांची पर्वणी

  मनमाड : योगेश म्हस्के शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवा निमित्ताने...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]