Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

नांदगाव येथे राष्ट्रवादी शरद युवा संवाद यात्रा संपन्न

May 11, 2022

युवक काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आतापासूनच थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे कार्यकर्ता जोडला तर आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचाच उमेदवार विजयी होईल यात शंका बाळगण्याचे कारण नाही. मात्र आपण निवडणूक लागली तरच तिची तयारी पंधरा दिवसात करतो असे न करता आतापासूनच तयारीला लागा असे आवाहन याप्रसंगी प्रदेशअध्यक्ष श्री मेहबूब शेख यांनी केले. शंभर वर्ष शेळी म्हणून जगण्यापेक्षा दहा दिवस वाघासारखे जगा तुम्ही किती दिवस जगले यापेक्षा कसे जगले ते लोकांनी नाव घेतले पाहिजे चिल्लर चा आवाज केला तर तो मोठा असतो तर नोटांचा आवाज होत नाही मात्र किंमत मोठी असते आपल्या माणसाची किंमत मोठी आहे आपला माणूस सुशिक्षित आहे त्यामुळे युवकांनी न घाबरता अंगावर आले तर शिंगावर घेण्याचे काम युवक राष्ट्रवादी काँग्रेसने करावे असे प्रदेशाध्यक्ष शेख यांनी सांगितले. यावेळी मा.आमदार पंकज भुजबळ, संजय पवार, जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, युवक जिल्हाअध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, विधानसभा अध्यक्ष विनोद शेलार,तालुकाध्यक्ष विजय पाटील, युवक जिल्हा उपाध्यक्ष प्रसाद सोनवणे, युवक तालुकाध्यक्ष सोपान पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, माजी आमदार पंकज भुजबळ, माजी आमदार संजय पवार,युवक जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग,तालुकाध्यक्ष विजय पाटील, माजी नगराध्यक्ष बबलू पाटील, शहराध्यक्ष बाळकाका कलंत्री, मनमाड शहराध्यक्ष दीपक गोगड, डॉ वाय.पी.जाधव उपस्थित होते.

याप्रसंगी युवक शहराध्यक्ष गौतम जगताप,हबीब शेख, नगरसेवक वाल्मीक टिळेकर,नारायण पवार, राजू लाठे,दत्तू पवार, सचिन जेजुरकर, अशोक पाटील,डॉ. भरत जाधव, किसनराव जगधने,प्रताप गरुड, शिवा सोनवणे, दया जुन्नरे, निलेश पवार, संपत पवार, संतोष बिन्नर, शिवा माळी, अक्षय पवार, गणेश चव्हाण, शुभम शिंदे, विशाल काळे, यश चव्हाण, विकास उशिरे,राहुल आहिरे, पंढरीनाथ गायकवाड, आकाश शेलार, किशोर महाजन, नरेंद्र महाजन, बापू रौंदळ,अक्षय देशमुख दिलीप निकम,महेश पवार, योगिता पाटील, सुगंधा खैरनार, जयश्री जुन्नरे, कविता राऊत आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद शेलार यांनी केले.

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ – प्रशासनाने नांदगाव तालुका त्वरित दुष्काळी जाहीर करावा – उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची मागणी

बघा व्हिडिओ – प्रशासनाने नांदगाव तालुका त्वरित दुष्काळी जाहीर करावा – उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची मागणी

मनमाड - नाशिक जिल्ह्यात यंदा पावसाने दडी मारल्याने दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागत असून...

read more
नांदगाव येथील रेल्वे अभियंता आणि कर्मचाऱ्याची समय सूचकता – प्रसंगावधान राखत होणारा रेल्वे अपघात,वित्तहानी आणि जीवितहानी पासून रक्षण

नांदगाव येथील रेल्वे अभियंता आणि कर्मचाऱ्याची समय सूचकता – प्रसंगावधान राखत होणारा रेल्वे अपघात,वित्तहानी आणि जीवितहानी पासून रक्षण

मनमाड - नांदगाव डेपो मधील हेल्पर खलाशी या पदावर नियुक्त असलेले कर्मचारी दगडू शेषराव आहेर हे...

read more
नांदगाव मतदारसंघात दुष्काळ जाहीर करण्याबाबत आमदार सुहास आण्णा कांदे आग्रही : मुख्यमंत्री यांची सकारात्मक भूमिका

नांदगाव मतदारसंघात दुष्काळ जाहीर करण्याबाबत आमदार सुहास आण्णा कांदे आग्रही : मुख्यमंत्री यांची सकारात्मक भूमिका

मनमाड - आमदार सुहास आण्णा कांदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत नांदगाव...

read more
दिवाळी आनंदाची – राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना फराळाचे वाटप

दिवाळी आनंदाची – राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना फराळाचे वाटप

आपण समाजाचे काहीतरी देण लागतो, या उक्ती प्रमाणे दरवर्षी मनमाड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]