loader image
[ays_poll id=7]

जिल्हापरिषद – प.स निवडणूक : गट- गण रचनेचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने केला जाहीर

May 12, 2022

ओबीसींच्या राजकीय आरक्षणच्या कारणावरून पुढे ढकलण्यात आलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता राज्यात पार पडणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांनतर राज्य निवडणूक आयोगानं निवडणुकांची तयारी सुरु केली आहे. राज्यात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची लगबग सुरु झाली असून राज्यातील जिल्हा परिषद गट गण रचनेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. राज्य निवडणूक आयोगाने जिल्हापरिषद, पंचायत समित्यांची गट आणि गण रचनेचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

असून नगर पालिकांसाठी प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगाने जिल्हापरिषद, पंचायत समित्यांची गट आणि गण रचनेचा कार्यक्रम जाहीर केला आहे. जून महिन्याच्या अखेरीस जिल्हापरिषद गट आणि पंचायत समिती गणांची रचना पूर्ण झालेली असेल. राज्य निवडणूक आयोगाने जिल्हापरिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी गट आणि गण रचनेचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

असा आहे कार्यक्रम…

गट आणि गण रचनेचे प्रारूप आयुक्तांकडे पाठवणे : 23 मे

त्या आराखड्यांना आयुक्तांनी मंजुरी देणे : 31 मे

प्रारूप गट गण रचना प्रसिद्धी : 2 जून 2022

प्रारूप रचनेवर आक्षेप : 8 जून 2022

आक्षेपांवर सुनावणी घेऊन अंतिम स्वरूप देणे : 22 जून 2022

अंतिम गट गण रचनेची प्रसिद्धी : 27 जून 2022

27 जून नंतर जिल्हापरिषद पंचायत समित्यांचे मतदारसंघ अंतिम झालेले असतील. त्यानंतर निवडणुकीचा ज्वर वाढणे सुरु होईल. राज्यात एकूण १४ महापालिका २५ जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणं बाकी आहेत. दोन वर्षानंतर एकत्र आलेल्या निवडणुका एकाच वेळी घेणं सोपं नसल्यामुळे त्यामुळे या सर्व निवडणुका दोन टप्प्यात घेण्याची तयारी निवडणूक आयोग करत असल्याची माहिती आहे.

अजून बातम्या वाचा..

मतदार संघातील धार्मिक स्थळ विकासासाठी केंद्राकडून निधी मिळावा – आ. कांदेच्या शिष्ट मंडळाने घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट

मतदार संघातील धार्मिक स्थळ विकासासाठी केंद्राकडून निधी मिळावा – आ. कांदेच्या शिष्ट मंडळाने घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट

नांदगाव - मनमाड शहर तसेच मतदार संघातील धार्मिक स्थळाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्रीय पर्यटन...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी...

read more
नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

    मनमाड येथे *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या वाढदिवसानिमित्त *आमदार...

read more
*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

  *मनमाड* महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे...

read more
.