Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिसंवाद सप्ताहास सुरुवात !

May 21, 2022

मंगळवार दि. १७ मे रोजी मनमाड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने हॉटेल ग्रीन थिंग येथे माजी आमदार पंकज भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत परिसंवाद सप्ताहची सुरवात करण्यात आली.या सप्ताहात मनमाड शहरातील विविध क्षेत्रातील नागरिकांशी थेट संवाद साधून मनमाड शहरातील विविध समस्या, अडचणी या बाबत चर्चा करण्यात येणार आहे. या सप्ताहाची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ जुनेजाणते सदस्यांबरोबर मा.आमदार श्री पंकज भाऊ भुजबळ यांनी संवाद साधत त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. माजी नगराध्यक्ष बबलू पाटील, शहराध्यक्ष दीपक गोगड, कार्याध्यक्ष नाना शिंदे,आय्याज खान,अशोक गरुड,विठ्ठल अण्णा नलावडे,संतोष परदेशी,फिरोज शाह आदींनी शहरातील पक्षीय पातळीवरील लेखाजोखा,शहरातील भेडसावणारे विविध प्रश्नांवर माजी आमदार भुजबळ यांचे सोबत चर्चा करण्यात आली. याप्रसंगी बोलतांना मा.आ.भुजबळ म्हणाले सर्व प्रभागात बुथ कमिटी स्थापन करा व पक्षबांधणी करा, कुणालाही न घाबरता पक्षाचे काम करत राहा,आपले वर्चस्व प्रस्थापित करा,मागील सर्व सोडून नव्याने सुरुवात करा,प्रत्येक कामाची आखणी करून आजपासून कामाला लागा,जुन्या जाणत्या सहकार्यांना बरोबर घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाने काम करा,पक्षाचे काम करणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्याना पदे द्या,काय काम करायचे याचे नियोजन करा,आता शालेय प्रवेशाचे दिवस असून प्रत्येक पालकांना सम्पर्क करून त्यांच्या पाल्याचे जन्म दाखले,प्रवेश प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करा, वृक्षारोपण या सारखे कर्यक्रम करीत राहा,सर्वांनी एकत्रित राहून काम करावे असे आवाहन केले.
या कार्यक्रमास
रवी भाऊ गायकवाड, पप्पूशेठ परब, संदीप पाटील,कुणाल बच्छाव,असिफ अत्तार, बबन आव्हाड,हेमंत परदेशी,
दीपक जॉर्ज,गोपी गरुड,
यश पाटील शिंदे,
राजेश तिवारी,भाऊ शिंदे,
दत्तात्रय थोरात,बाबा पठाण हे उपस्थित होते.
या चर्चेत प्रामुख्याने मा.आमदार पंकज भाऊ भुजबळ,
शहराध्यक्ष दीपक गोगड,
कार्यध्यक्ष नाना शिंदे, मा.नगरसेवक प्रकाश बोधक,जेष्ठ नेते,
विठ्ठल अण्णा नलावडे,
मा.नगराध्यक्ष योगेश पाटील,
आनंद बोथरा,
योगेश(बाळासाहेब)जाधव,
अक्षय देशमुख, यांनी सहभाग घेतला.

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ – सह्याद्री सेवक गडकिल्ले संवर्धन संस्थेतर्फे अंकाई – टंकाई किल्ले येथे संवर्धन मोहीम संपन्न

बघा व्हिडिओ – सह्याद्री सेवक गडकिल्ले संवर्धन संस्थेतर्फे अंकाई – टंकाई किल्ले येथे संवर्धन मोहीम संपन्न

मनमाड - छत्रपती शिवाजी महाराजांनी शत्रूपासून रक्षण करण्यासाठी महाराष्ट्रातील गड किल्ल्याना ढाल...

read more
शहरात सुरू असलेल्या विकास कामांबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख माधव शेलार यांचे नगर परिषद प्रशासनाला निवेदन

शहरात सुरू असलेल्या विकास कामांबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख माधव शेलार यांचे नगर परिषद प्रशासनाला निवेदन

मनमाड - (प्रतिनिधी) मनमाड नगर परीषदेचे मुख्याधिकारी शेषराव चौधरी , आरोग्य निरीक्षक विजयकुमार...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]