नांदगाव सोमनाथ घोगांणे
नांदगाव शहरातील प्रसिद्व व्यापारी रिखबकाका कासलीवाल यांची नात व युवा उद्योजक समीर कासलीवाल यांची कन्या कुमारी आर्या हिची राज्यस्तरीय कॅरम स्पधैसाठी निवड करण्यात आली.
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग व युवक सेवा संचालनालय जिल्हा क्रीडा अधिकारी धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत १४ वर्षाखालील विभागस्तरीय कॅरम स्पर्धा नुकत्याच शिरपूर येथे मोठया उत्साहात पार पडल्या या स्पर्धेत नाशिक विभागातील ६४ खेळाडूनी सहभाग नोंदविला होता.
या स्पर्धेत येवला येथील विद्या इंटरनॅशनल खेळाडू आर्या समीर कासलीवाल हिने ज्वहेरी अन्सारी धुळे,श्रेया माहालपुरे जळगाव, बिनी फातीया मालेगाव,अरूण सोळसे जळगाव या खेळाडूवर अंत्यत शांत व संयमाने कलात्मक गुणांचा खेळ करून विजय प्राप्त केला. या विजयामुळे तिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सलग दुसऱ्या वर्षी निवड झाली. तिच्या या नेत्रदिपक कामगिरी बद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील धुळे,जिल्हा प्रभारी क्रीडा अधिकारी अविनाश टिळे, येवला तालुका क्रीडा संयोजक नवनाथ उंडे,नांदगाव युवा उद्योजक आनंद कासलीवाल,अमोल नावंदर,सचीन पारख,सोमनाथ घोगांणे , नुतन कासलीवाल आदीनी आर्या हिचे अभिनंदन केले.










