loader image
[ays_poll id=7]

लष्करी जवानाचा आपल्या एकुलत्या एक मुलासह नगर जवळ कार अपघातात मृत्यू

May 24, 2022

भावाच्या वर्षश्राद्धासाठी सुट्टीवर घरी आलेल्या लष्करी जवानाचा आपल्या एकुलत्या एक मुलासह नगर जवळ कार अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी पहाटे घडली.

बाजीराव त्र्यंबक मिस्कर (वय ३८), साई (वय १२) हनुमान नगर, मनमाड असे मृत पिता पुत्राचे नाव आहे. भारतीय सैन्य दलात पंजाबमधील हिस्सार येथे कार्यरत असलेले जवान बाजीराव मिस्कर हे भावाच्या वर्षश्राध्दासाठी सुट्टीवर मनमाड येथे आले होते. नुकतेच त्यांच्या मेहुण्याचा विवाह झाला होता. आपल्या मुलासह स्वत:च्या अल्टो कारने रविवारी रात्रीमनमाड येथून जेजुरी येथे खंडोबाच्या दर्शनासाठी जात असताना काळाने या पिता पुत्रावर झडप घातली.अपघात इतका भीषण होता की त्यात कारचा चक्काचूर झाल्याने दोघा पिता-पुत्राचा जागीच मृत्यू झाला.

या अपघाताची माहिती कुटुंबियांना कळताच त्यांनी तातडीने नगरकडे धाव घेतली. या घटनेने शहर परिसरात शोककळा पसरली आहे. दरम्यान मनमिळावू असलेले बाजीराव सर्वांना परिचित होते. ते सुट्टीवर आल्यानंतर सर्व नातेवाईक, मित्रमंडळींना भेटत होते. देवाला जाताना त्यांच्यावर काळाने क्रूर घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगी, भाऊ, दोन भावजयी असा परिवार आहे.

अजून बातम्या वाचा..

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

मनमाड - भारतीय जनता पार्टी देश स्तरावर विविध क्षेत्रामध्ये काम करीत असते कामगार क्षेत्रामध्ये...

read more
भारतीय क्रीडा प्राधिकरण व भारतीय वेटलिफ्टिंग संघटना यांचे संयुक्त विद्यमाने अस्मिता खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन

भारतीय क्रीडा प्राधिकरण व भारतीय वेटलिफ्टिंग संघटना यांचे संयुक्त विद्यमाने अस्मिता खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन

मनमाड येथे रविवार दिनांक १०/०८/२०२५ रोजी जय भवानी अद्यावत व्यायामशाळा येथे करण्यात आले आहे नाशिक...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या स्पर्धा देशभक्त नागरिक निर्माण करणारी कार्य शाळा

मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या स्पर्धा देशभक्त नागरिक निर्माण करणारी कार्य शाळा

बाजीराव महाजन मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्व.लोकमान्य टिळक आणि लोक शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या...

read more
रिच एज्युकेशन ऍक्शन प्रोग्राम आणि सेंट झेवियर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्टेम प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

रिच एज्युकेशन ऍक्शन प्रोग्राम आणि सेंट झेवियर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्टेम प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

मनमाड - विज्ञान, तंत्रज्ञान अभियांत्रिकी आणि गणित या विषयातील संकल्पना खेळण्याच्या (स्वयंचलित...

read more
शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार 2025 मा. ज्येष्ठ साम्यवादी नेते भाई जयंत पाटील यांना जाहिर

शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार 2025 मा. ज्येष्ठ साम्यवादी नेते भाई जयंत पाटील यांना जाहिर

. शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव...

read more
.