नांदगाव शहरातील मल्हारवाडी जवळील दहेगाव फाटा जवळ कुत्र्याच्या हल्ल्यात एका हरणांच्या पाडासाचा मृत्यू झाला .
याबाबत सविस्तर माहिती अशी की,
शहरातील मल्हारवाडी जवळील डोंगर परिसरात हरणांचे कळप पाण्याच्या शोधात वन्यप्राणी मानवी वस्ती कडे पाणी पिण्यासाठी येत असतात.. हरणांच्या कळपातील एका पाडसा वर भटक्या कुत्र्यांनी हल्ला चढवला त्यात गंभीर जखमी झालेल्या पाडसाची स्थानिक नागरिकांनी व सर्पमित्र विजय बडोदे यांनी त्याची सुटका केली . मात्र त्या पाडसाचा मृत्यू झाला. सर्पमित्र बडोदे यांनी वनविभागाला ताबडतोब दुरध्वनीवरुन सदर या घटनेची माहिती दिली. यावेळी वनविभाग कर्मचारी संतोष दराडे यांच्या ताब्यात पाडसाला देण्यात आले.
सरदार पटेल रोडचे ‘शुक्लकाष्ट’ कधी संपणार?
मनमाड शहरातील मध्यवर्ती बाजारपेठेतील मुख्य रस्ता असलेल्या सरदार पटेल या मार्गाची अत्यंत दयनीय...










