Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती शहरामध्ये उत्साहात साजरी….

May 31, 2022

मनमाड : पहिली स्त्री ज्यांनी स्त्रियांची सेना बनवून नारी शक्तीचा परिचय जगाला करून दिला, एक अतिशय योग्य शासक व संघटक न्यायप्रियता,पराक्रमी योद्धा,आणि सर्वश्रुत धनुर्धर ह्या सर्व गोष्टीमध्ये पारंगत असणाऱ्या तसेच इतिहासाच्या कालपाटावर स्त्री व्यक्तिमत्वचा ठसा उमटवणाऱ्या, होळकर घराण्याचा ‘तत्वज्ञानी राणी ‘ म्हूणन ओळखल्या जाणाऱ्या अश्या ह्या महाराणी राजमाता अहिल्याबाई होळकर यांची आज जयंती.

अहिल्याबाई होळकर या केवळ एक महान शासकच नव्हे तर अनेक युद्धांमध्ये साहसी योध्याप्रमाणे विचारपूर्वक निर्णय घेत त्यांनी युद्धाचे नेतृत्व सुद्धा केले. शिवाय अहिल्याबाई अश्या शासकांमधून एक होत्या ज्या आपल्या प्रांताच्या रक्षणार्थ व अन्याया विरुद्ध आक्रमण करण्यास कधीही मागेपुढे पाहत नसत.महाराणी अहिल्याबाईंची ओळख मावळ प्रांताच्या राजमाता अशी झाली, त्यांच्यातील अद्भुत साहसाला आणि अदम्य प्रतिभेला पाहून मोठ-मोठे राजे आणि प्रभावशाली शासक देखील आश्चर्यचकित होत असत. त्यांनी राज्यकारभारात अनेक बदल घडवून आणले. पूर्वीच्या कायद्यांमध्ये त्यांनी परिस्थितीनुसार काही सुधारणा केल्या. करपद्धती सौम्य केली; गावोगावी न्याय देणारे पंच अधिकारी नेमले.

शहरामध्ये राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९७ वि जयंती मोठ्या उत्साहात, साजरी करण्यात आली मा.श्री राजाभाऊ पगारे,डॉ सुनिल बिडगर, डॉ हाके ह्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणुन मयूर बोरसे ,अमीन पटेल,अमोल नरवडे,परेश राऊत,ललित रसाळ,संकेत शिंदे,अभिजित रसाळ,सुमेर मिसर,ऋतिक उल्हाळे,अनिल जाधव,आर्यन गडदे,सोनू स्वामी
समाज बांधव अनिरुद्ध तोंडे,सनी फसाटे,बालनाथ चोरमले,सुनील कुनगर,चेतन गोऱ्हाणे ,समीर कुनगर,मनसुख भाऊ कुनगर,संतराम गडदे,मंगेश घोलप
महिला मंडळ सौ सविता गिडगे,सौ प्रियंका गडदे-तोंडे,सौ पुष्पा मतकर, सौ संगीता हाके,श्रीमती अंजली तोंडे,सौ सुचिता तोंडे,संध्या काचगुंडे, श्रीमती किरणताई शिंदे आदी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

१ जुलै पासून केंद्राने लागु केलेल्या कायद्याची पोलिस स्टेशनला अमलबजावणी गुन्हेगारांना बसणार जरब

१ जुलै पासून केंद्राने लागु केलेल्या कायद्याची पोलिस स्टेशनला अमलबजावणी गुन्हेगारांना बसणार जरब

  नांदगांव : मारुती जगधने इंग्रज काळातील कायद्यात केंद्र शासनाने बदल केला असून गत ७५ वर्षाहुन...

read more
राज्यात ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करणार  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा

राज्यात ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा

मुंबई, दि. २९: राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचे दर्शन घडविण्यासाठी मुख्यमंत्री...

read more
मिशन विधानसभा – मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची अर्थमंत्री अजित पवारांकडून घोषणा

मिशन विधानसभा – मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची अर्थमंत्री अजित पवारांकडून घोषणा

मुंबई, 28 जून : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी राज्याचे अर्थमंत्री...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]