Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद आहेर ची राष्ट्रीय खेलो इंडिया स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी

Jun 6, 2022

जय भवानी व्यायामशाळेचा आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर याने पंचकुला हरियाणा येथे सुरू असलेल्या चौथ्या राष्ट्रीय खेलो इंडिया स्पर्धेत 55 किलो वजनी गटात चमकदार कामगिरी करीत चुरशीच्या लढतीत सुवर्णपदक पटकावले स्नॅच मध्ये 99 किलो व क्लिन जर्क मध्ये 121 किलो असे एकूण 220 किलो वजन उचलून मुकुंद सुवर्णपदकाचा मानकरी ठरला आहे. खेलो इंडिया स्पर्धेतील मुकुंद चे हे सलग दुसरे सुवर्णपदक आहे. यशस्वी खेळाडूला छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे तसेच आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांचे मार्गदर्शन लाभले. जय भवानी व्यायामशाळेचे अध्यक्ष डॉ विजय पाटील,मोहन अण्णा गायकवाड,डॉ सुनील बागरेचा,प्रा दत्ता शिंपी,छत्रे विद्यालयाचे आधारस्तंभ पी जी धारवाडकर, अध्यक्ष पी जे दिंडोरकर, सचिव दिनेश धारवाडकर, संचालक नाना कुलकर्णी,प्रसाद पंचवाघ,मुख्याध्यापक आर एन थोरात, उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे,पर्यवेक्षिका सौ पोतदार एस एस यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

अजून बातम्या वाचा..

महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी यांना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी भेटून सदिच्छा व्यक्त केल्या

महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी यांना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी भेटून सदिच्छा व्यक्त केल्या

द्रौपदी मुर्मू यांनी भारताच्या १५ व्या महामहिम राष्ट्रपती म्हणून आज शपथ घेतली आहे.पहिल्या महिला...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालय तर्फे आयोजीत आंतरशालेय निबंध स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद

मनमाड सार्वजनिक वाचनालय तर्फे आयोजीत आंतरशालेय निबंध स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद

मनमाड शहरात गेल्या ५० वर्षापेक्षा जास्त असणारी स्पर्धेची परंपरा टिकवित मनमाड सार्वजनिक...

read more
युवती सेना व शिवसेना महिला आघाडीच्या आंदोलनाला यश ; मनमाड माळेगाव बस सेवा पूर्ववत सुरू

युवती सेना व शिवसेना महिला आघाडीच्या आंदोलनाला यश ; मनमाड माळेगाव बस सेवा पूर्ववत सुरू

आमदार सुहास आण्णा कांदे व सौ. अंजुमताई कांदे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना महिला आघाडी व युवती...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]