Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

“आमदार आपल्या दारी” अभियान : मनमाडकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद

Jun 6, 2022

नांदगाव विधानसभा मतदार संघाच्या इतिहासात पहिल्यांदाच आमदार सुहास आण्णा कांदे यांनी “आमदार आपल्या दारी” या धर्तीवर जनता दरबाराचे आवाहन केले आणि मोठ्या अभूतपूर्व संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून प्रतिसाद दिला.
आमदार सुहास कांदे यांच्या माध्यमातून आमदार आपल्या दारी या मोहिमेची सुरुवात आजपासून मनमाड मधील पूर्व भागापासून सुरुवात करण्यात आली असून यामध्ये बुरकुलवाडी,माऊली नगर, किर्ती नगर,कोतवाल नगर, सिकंदर नगर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर, तिरंगा नगर व गौतम नगर या भागातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.
प्रारंभी आमदार सुहास कांदे व उपस्थित सर्व खात्यांच्या अधिकाऱ्यांनी महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात केली.
सुमित प्लाझा, बीएसएनएल ऑफिस शेजारील पटांगणावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून आपल्या समस्या आमदार सुहास अण्णा कांदे यांच्यासमोर मांडल्या असता संबंधित अधिकाऱ्यांची उत्तर व आमदार कांदे यांनी मध्यस्थी करत नागरिकांच्या समस्या मार्गी लावल्या तसेच समस्या निराकरण करण्याचे आश्वासन दिले.
आमदार सुहास अण्णा कांदे यांची कार्यप्रणाली आणि विकासाच्या योजनांमुळे प्रत्येक घराघरातील व्यक्ती आमदारांना जवळून ओळखायला लागलेला आहे अशा परिस्थितीत आमदार आपल्या दारी या माध्यमातून आमदार कांदे यांच्या या अभिनव संकल्पनेला मनमाडकर नागरिकांनी उपस्थित राहत पाठींबा दर्शविला.
आमदार आपल्या दारी या कार्यक्रमात जवळपास 172 नागरिकांच्या समस्या तक्रार अर्ज दाखल झाले. नगरपालिकेच्या कर्मचारी चकोर मॅडम यांचे सेवेत असताना कोरोना मुळे निधन झाले, त्यांच्या मातोश्री यांना पन्नास लाख रुपये धनादेश आमदार सुहास अण्णा कांदे व मुख्याधिकारी सचिन पवार पटेल यांच्या हस्ते देण्यात आला.
नगरपालिका , महावितरण संबंधित रेशन कार्ड संबंधित नागरिकांनी समस्या मांडल्या असता संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांना त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे त्वरित आश्वासन दिले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस शिवसेनेतर्फे उपस्थित सर्व शासकीय अधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी शासकीय विभागातून, तहसीलदार सिद्धार्थ मोरे, मनमाड नगरपालिका मुख्याधिकारी डॉक्टर सचिन कुमार पटेल, बी डि ओ नांदगाव पंचायत समिती, मनमाड पोलिस स्टेशन एपीआय श्री गीते, बांधकाम खात्याचे खैरनार, पवार, कृषी विभाग नांदगाव तालुका आरोग्य विभागाचे डॉक्टर जगताप, भूमिअभिलेख विभागाचे नितनवरे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार मोरे हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहर प्रमुख मयूर बोरसे यांनी केले तर सूत्रसंचालन अनिल दराडे, नाना पाटील यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शहर प्रमुख मयूर बोरसे, जिल्हा उपप्रमुख संतोष बळीद, जिल्हा संघटक राजाभाऊ भाबड, जिल्हा समन्वयक भाऊ पाटील, तालुका संघटक संजय कटारिया, सुभाष माळवतकर,गोटू केकान, युवासेनेचे मुन्ना भाऊ दरगुडे, अमीन पटेल, अंकुश गवळी,सिद्धार्थ छाजेड, योगेश इमले, सचिन दरगुडे,ज्येष्ठ नेते अल्ताफ बाबा खान, माजी नगराध्यक्ष साईनाथ गिडगे, पिंटू शिरसाठ, जाफर मिर्झा, गालीब शेख,विनय आहेर, शहर उपप्रमुख दिनेश घुगे, शहर संघटक मुराद शेख, महेंद्र गरुड,बबलू शेख, अजू शेख, प्रवीण नागरे, लाला नागरे, पिंटू वाघ, शाखाप्रमुख कैलास सोनवणे, उपविभाग प्रमुख बापू शिंत्रे,शाखाप्रमुख ज्ञानेश्‍वर उगले, बूथप्रमुख सूर्यभान बोरसे गटप्रमुख धर्मा पवार आदी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात पार पडलेल्या कबड्डी स्पर्धेत मनमाड बॉईज संघाला विजेतेपद

महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात पार पडलेल्या कबड्डी स्पर्धेत मनमाड बॉईज संघाला विजेतेपद

मनमाड: महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे संस्थेच्या...

read more
गुड शेफर्ड स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा यासाठी विविध प्रकाराच्या स्पर्धाचें आयोजन

गुड शेफर्ड स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा यासाठी विविध प्रकाराच्या स्पर्धाचें आयोजन

मनमाड:- गुड शेफर्ड इंग्लिश स्कूल मध्ये विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा याकरिता विविध...

read more
बघा व्हिडिओ – आ. सुहास  कांदे यांच्या माध्यमातून नांदगाव मतदार संघात झालेल्या विविध विकास कामांचे लोकार्पण

बघा व्हिडिओ – आ. सुहास कांदे यांच्या माध्यमातून नांदगाव मतदार संघात झालेल्या विविध विकास कामांचे लोकार्पण

नांदगाव सोमनाथ घोंगाणे नांदगाव तालुक्यातील कळमदरी येथे आमदार सुहास कांदे यांच्या माध्यमातून विविध...

read more
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुक जाहीर : ३ नोव्हेंबर ला मतदान – ठाकरे गट आणि शिंदे गटाची परीक्षा

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुक जाहीर : ३ नोव्हेंबर ला मतदान – ठाकरे गट आणि शिंदे गटाची परीक्षा

निवडणूक आयोगाकडून आज अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला....

read more
सार्वजनिक ग्रंथालय बहुजनांची ज्ञान केंद्रे बनावीत : प्रतिभा शिंदे मुक्तीभूमी स्मारक व वाचनालयास दिली सदिच्छा भेट

सार्वजनिक ग्रंथालय बहुजनांची ज्ञान केंद्रे बनावीत : प्रतिभा शिंदे मुक्तीभूमी स्मारक व वाचनालयास दिली सदिच्छा भेट

येवला (प्रतिनिधी) महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील सर्व धर्मग्रंथा सोबत...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]