नांदगाव सोमनाथ घोंगाणे
नांदगाव शहरातील समता चौकातील सकल हिंदू समाज मित्र मंडळाच्या वतीने नवदुर्गा पुरस्कार “जागर शक्तीचा सन्मान नारी शक्तीचा” अंतर्गत नांदगाव परिसरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जिल्हाध्यक्ष व्यापारी आघाडी भाजपा, नाशिक जिल्हा दत्तराज छाजेड हे होते तर प्रमुख अतिथी प्रा. सुरेश नारायणे व भा.ज.प सेलचे संघटक व प्रचारक सागर फाटे,मयुर शिंदे आदींच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला . आज समाजाच्या विविध क्षेत्रात महिलांनी झेप घेतली आहे. आजची स्री ही चुल आणि मुल एवढ्या पुरतीच मर्यादित राहिलेली नाही तर स्त्रीने आज राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, क्रीडा या विविध क्षेत्रात नाविन्यपूर्ण कामगीरी करत आहे. ही अभिमानाची बाब आहे. स्री हीच कुटुंबाचा,समाजाचा मजबुत पाया आहे. सुसंस्कारित स्री कुटुंबाबरोबर समाज व राष्ट्र प्रगतीला पुरक आहे. परंतु आजच्या टि.व्ही. वरील मालिका आणि मोबाईलच्या अति वापरामुळे स्त्रियांचे कुटुंबाकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत प्रा. सुरेश नारायणे यांनी यावेळी व्यक्त केली. त्यासाठी प्रत्येकाने व कुटुंबाने आपल्या घरचा टि.व्ही. व मोबाईल सायंकाळी सात ते साडेआठ या दिड तासात बंद ठेवा व यावेळेत मुलांचा अभ्यास, स्वतः वाचन या सवयी लावुन घेण्याचा त्यांनी सल्ला दिला. समाज विघाताला मारक असलेल्या मालीकांमुळे घरात सासु-सुन,पती-पत्नी,मुलां मध्ये वाद होतात व हे वाद विकोपाला गेल्यास त्यातुन काही वेळा गुन्हे घडतांना ची अनेक उदाहरणे आहेत. तेव्हा अशा घातक मालिका पासुन दुर राहण्याचा त्यांनी सल्ला दिला. व सन्मानित स्त्रियांचे त्यांनी अभिनंदन व कौतुक केले. यावेळी ज्योती महेश सुरसे(शिक्षिका) ,माया सोनवणे(एस.टी.कंडक्टर), डॉ. ख्याति तुसे(ग्रामिण रुग्णालय नांदगाव),रंजना शिंदे(पोलिस, नांदगाव पोलिस स्टेशन),संगीता देवरे(नांदगाव पोस्ट ॴॅफिस) ,ॶॅड.विद्या कसबे(वकील, सामाजिक कार्यकर्त्या) ,संगिताताई सोनवणे,(सामाजिक कार्यकर्त्या)खुशी कदम (गृहीणी) विद्या गोरखनाथ देवरे (माळी) मॅडम, (शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी)
या नऊ महिलांना हिंदू समाज मित्र मंडळाच्या महिला सदस्य रितु संजय भावसार,पुजा दत्तात्रय भावसार, कविता कैलास भावसार, संगिता भरत भावसार, रुपाली सुनील गायकवाड, अनिता हरिभाऊ गायकवाड,उमा किरण भावसार या महिला सदस्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.यावेळी ॳॅड. विद्या कसबे,संगिता ताई सोनवणे, डॉ.ख्याति तुसे,ज्योति महेश सुरसे व विद्या देवरे ( माळी, मॅडम) यांनी सत्कार प्रस़ंगी मनोगत व्यक्त केले. व मंडळाने पुरस्कार देवून सन्मान दिल्याबद्दल आभार मानले. तसेच यावेळी सागर फाटे यांनी मनोगत व्यक्त केले. तर समाज विकासात स्त्रीचे अनन्य साधारण महत्व आहे. कुटुंबात स्री व पुरुष हे दोन्ही रथाचे चाके आहेत. यांच्यात सुसंवाद असल्यास देश विकासाला नक्कीच चालना मिळेल. व सर्व पुरस्कार प्राप्त महिलांचे अभिनंदन केले.व भावी कार्यास शुभेच्छा दिल्या. असे विचार दत्तराज छाजेड यांनी अध्यक्षीय मनोगतात मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितेश शर्मा यांनी केले.

सिध्देश भावसार, राहुल पैठणकर,मयुर शिंदे,सौरभ वर्देकर,चेतन जाधव,मनोज मोकळ,परशराम हरळे,रामा शर्मा, व सकल हिंदू समाज मित्र मंडळाच्या सदस्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.












