Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुक जाहीर : ३ नोव्हेंबर ला मतदान – ठाकरे गट आणि शिंदे गटाची परीक्षा

Oct 3, 2022

निवडणूक आयोगाकडून आज अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार १४ ऑक्टोबरपर्यंत या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. त्यानंतर ३ नोव्हेंबरला अंधेरी पूर्व मतदारसंघात मतदान होईल. तर ६ नोव्हेंबर रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाईल. शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचा दुबईत हदयविकारच्या झटक्याने मृत्यू झाला होता. त्यामुळे ही जागा रिक्त झाली होती. एखाद्या आमदाराचा मृत्यू झाल्यास सहा महिन्यांच्या आत संबंधित मतदारसंघात पोटनिवडणूक घेणे गरजेचे असते. त्यानुसार निवडणूक आयोगाने अंधेरी पूर्व मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकीसाठी आता शिवसेना आणि भाजपने आपले उमदेवार अगोदरच जाहीर केले आहेत. तर दुसरीकडे या निवडणुकीसाठी शिवसेनेला धनुष्यबाण हे चिन्ह वापरता येणार का नाही हे बघणे औत्सुक्याचे ठरेल.

अजून बातम्या वाचा..

अमरावती विभागात  आ. सुहास कांदे यांच्या नियोजनबद्ध रणनीतीमुळे किरण सरनाईक यांचा दणदणीत विजय

अमरावती विभागात आ. सुहास कांदे यांच्या नियोजनबद्ध रणनीतीमुळे किरण सरनाईक यांचा दणदणीत विजय

अमरावती विभागात आ. सुहास कांदे यांच्या नियोजनबद्ध रणनीतीमुळे किरण सरनाईक यांचा दणदणीत विजय अमरावती...

read more
आकांक्षा व्यवहारेचे सुवर्णपदक, मेघा आहेरला कांस्यपदक; श्रावणी पुरंदरेचा चौथा क्रमांक

आकांक्षा व्यवहारेचे सुवर्णपदक, मेघा आहेरला कांस्यपदक; श्रावणी पुरंदरेचा चौथा क्रमांक

आकांक्षा व्यवहारेचे सुवर्णपदक, मेघा आहेरला कांस्यपदक; श्रावणी पुरंदरेचा चौथा क्रमांक पश्चिम...

read more
महिलेच्या गळ्यातील पोत ओरबाडून चोरटे पसार; शहरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण

महिलेच्या गळ्यातील पोत ओरबाडून चोरटे पसार; शहरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण

मनमाड- शहरातील अत्यंत गजबजलेल्या विवेकानंद नगर दोन परिसरात राहणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे...

read more
पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी आकांक्षा व्यवहारे, मेघा आहेर व श्रावणी पुरंदरे यांची निवड

पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी आकांक्षा व्यवहारे, मेघा आहेर व श्रावणी पुरंदरे यांची निवड

      पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी आकांक्षा व्यवहारे, मेघा आहेर व...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]