loader image

चांदवड सह तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट आणि पाऊस (बघा व्हीडीओ)

Jun 9, 2022


चांदवड शहर व तालुक्यात अनेक भागात वादळी वारा ,गारपीट
नाशिक जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला असून काल मनमाड तर आज चांदवड शहर परिसर,तसेच गिरणारे या ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट आणि जोरदार पावसाने संध्याकाळच्या सुमारास हजेरी लावली,वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे पडली तर काही ठिकाणी घरांची छत उडाली,पावसाचा जोर इतका होता की शहरातील अनेक भागातून नदीला पूर यावा आशा पद्धतीने पाणी वाहत होते जोरदार वादळामुळे मोठे नुकसान झाले आहे,मनमाड पासून काही अंतरावर असलेल्या गिरणारे परिसरात पुन्हा जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने विशेषतः कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.


अजून बातम्या वाचा..

आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून माणिकपुंज धरणावरून नव्या जलवाहिनी साठी दोन कोटी रुपये मंजूर

आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून माणिकपुंज धरणावरून नव्या जलवाहिनी साठी दोन कोटी रुपये मंजूर

माणिकपुंज धरण ते नांदगाव येथील जलकुंभ येथे होणाऱ्या पाणीपुरवठा साठीची जलवाहिनी सतत फुटत असल्यामुळे...

read more
.