Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

नागरकोट हिमाचल प्रदेश येथे होणाऱ्या पहिल्या राष्ट्रीय खेलो इंडिया महिला लीग वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी जय भवानी व्यायामशाळेच्या पाच खेळाडूंची निवड.

Jun 11, 2022


भारतीय वेटलिफ्टिंग महासंघाचे वतीने 15 ते 22जून 2022 दरम्यान आयोजित भारतातील पाहिल्या महिलांच्या खेलो इंडिया रँकिंग स्पर्धांचे आयोजन नागरकोट हिमाचल प्रदेश येथे करण्यात आले आहे.भारतातील सर्वोत्तम खेळांडूमध्ये स्पर्धा होऊन युथ ज्युनिअर व सिनियर च्या प्रत्येकी 10 वजनी गटात स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून, प्रत्येक वयोगट व वजनी गटात पहिल्या 8 खेळाडूंना रोख बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
मनमाड महाविद्यालयाच्या दिया किशोर व्यवहारे,धनश्री विनोद बेदाडे,छत्रे विद्यालयाची संध्या भास्कर सरोदे,करिश्मा रफिक शेख,निकिता वाल्मिक काळे या जय भवानी व्यायामशाळेच्या खेळाडूंची पहिल्या महिला खेलो इंडिया रँकिंग लीग साठी महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग संघात निवड करण्यात आली आहे.
यशस्वी खेळाडूंना छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे,आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
जय भवानी व्यायामशाळेचे अध्यक्ष डॉ विजय पाटील,मोहन अण्णा गायकवाड,डॉ सुनील बागरेचा प्रा दत्ता शिंपी,छत्रे विद्यालयाचे आधारस्तंभ पी जी धारवाडकर, अध्यक्ष पी जे दिंडोरकर, सचिव दिनेश धारवाडकर, संचालक नाना कुलकर्णी प्रसाद पंचवाघ,मुख्याध्यापक आर एन थोरात, उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे,पर्यवेक्षिका सौ पोतदार एस एस यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

अजून बातम्या वाचा..

१ जुलै पासून केंद्राने लागु केलेल्या कायद्याची पोलिस स्टेशनला अमलबजावणी गुन्हेगारांना बसणार जरब

१ जुलै पासून केंद्राने लागु केलेल्या कायद्याची पोलिस स्टेशनला अमलबजावणी गुन्हेगारांना बसणार जरब

  नांदगांव : मारुती जगधने इंग्रज काळातील कायद्यात केंद्र शासनाने बदल केला असून गत ७५ वर्षाहुन...

read more
राज्यात ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करणार  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा

राज्यात ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा

मुंबई, दि. २९: राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचे दर्शन घडविण्यासाठी मुख्यमंत्री...

read more
मिशन विधानसभा – मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची अर्थमंत्री अजित पवारांकडून घोषणा

मिशन विधानसभा – मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची अर्थमंत्री अजित पवारांकडून घोषणा

मुंबई, 28 जून : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी राज्याचे अर्थमंत्री...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]