Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

(बघा व्हीडीओ) टाळ मृदुंगाच्या गजरात मनमाड ते पंढरपुर पायी दिंडीचे प्रस्थान

Jun 20, 2022

मनमाड : ( योगेश म्हस्के)चला पंढरीला जाऊ….विठ्ठल डोळा भरून पाहू , वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरू होऊन पंढरपूर येथे संपणारी सामुदायिक एक पदयात्रा (दिंडी) होय. वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे .

वारी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी अशा दोन्ही वेळा होते. आळंदी येथून संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पादुका आणि देहू येथून संत तुकाराम महाराज यांच्या पादुका पालखीत ठेवून ती पालखी रथातून पंढरपूर येथे मार्गस्थ होते. संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम हे वारकरी संप्रदायातील महत्वाचे संत आहे . वारकरी संप्रदायात लहान मोठा हा भेद नाही. तसेच नामजपाने पुण्य मिळते हा भाव आहे. एकादशी आणि इतर पवित्र दिवशी नित्यनेमाने पंढरपूरला जाणे म्हणजेच वारी होय. जो नियमित वारी करतो तो वारकरी. वारकरी जो धर्म पाळतात त्याला वारकरी धर्म असे म्हणतात. वारकरी धर्मालाच भागवत धर्म म्हटले जाते. ’पंढरीचा वास, चंद्रभागेस्नान, आणिक दर्शन विठोबाचे’ या इच्छेपोटी वारकरी वारी चुकवत नाहीत, अशी भागवत संप्रदायाची धारणा आहे . त्यामुळेच आषाढी वारी ही प्रत्येक वारकरी महिलापुरुषांच्या मनात आदराचे आणि श्रद्धेचे स्थान बाळगून आहे असे मानले जाते.

मनमाड येथुन देखील आषाढीवारी निमित्ताने गेल्या 42 वर्षांपासून मनमाड ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे. श्री संत कैकाडी महाराज , हभप कोंडीराम काका , हभप रामदास महाराज , संत लहरिनाथ महाराज या महान संतांच्या पालखी सोहळ्याचे हभप भारत महाराज जाधव यांच्या प्रेरणेने आणि हभप बाळासाहेब महाराज इप्पर यांच्या मार्गदर्शनाने आयोजन करण्यात आले आहे. साधारण 23 दिवस मनमाड शहर आणि परिसरातील शेकडो वारकरी पायी चालून अखंड भजन , कीर्तन , टाळ-मृदुंगाच्या गजर करत श्री क्षेत्र पंढरपूर येथे आषाढीवारीला पोहचणार आहे.आज सायंकाळी श्री दत्त मंदिर येथुन पालखी रथाचे मान्यवरांच्या हस्ते पुजन करून दिंडी सोहळ्याचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाले , यावेळी शहर आणि परिसरातील भाविक मोठया संख्येने या पालखी सोहळ्याचे दर्शन घेण्यासाठी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, चांदवड व निफाडसह राज्यातील 19 तालुक्यात पिकांचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश

जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, चांदवड व निफाडसह राज्यातील 19 तालुक्यात पिकांचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, आणखी १९ तालुक्यांमध्ये #दुष्काळ जाहीर...

read more
रोजगार महाकुंभ’ भव्य रोजगार मेळावा उत्साहात संपन्न. ११ कंपन्यांचा सहभाग; 236 पेक्षा जास्त युवकांचे रजिस्ट्रेशन आणि जवळपास 162 युवकांची अंतरिम निवड

रोजगार महाकुंभ’ भव्य रोजगार मेळावा उत्साहात संपन्न. ११ कंपन्यांचा सहभाग; 236 पेक्षा जास्त युवकांचे रजिस्ट्रेशन आणि जवळपास 162 युवकांची अंतरिम निवड

नाशिकच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला,...

read more
चांदवड तालुक्याचा ट्रिगर-1 मध्ये समावेश करावा – आमदार आहेर यांची मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांकडे मागणी

चांदवड तालुक्याचा ट्रिगर-1 मध्ये समावेश करावा – आमदार आहेर यांची मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांकडे मागणी

राज्यातील २६८ तालुक्यांमध्ये खरीप हंगामासाठी ‘ट्रिगर-१’ लागू करून दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]