राज्यात विधान परिषद निवडणुकीनंतर झालेल्या राजकीय भूकंपाने आघाडी सरकार जाणार की राहणार हा महत्वाचा प्रश्न असून शिवसेनेकडून अजूनही आमदारांना परत येण्याची साद घातली जात आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या गटाची संख्या हळू हळू वाढतच आहे. तब्बल तीन दिवसाच्या प्रतीक्षेनंतर कृषी मंत्री दादा भुसे अखेर एकनाथ शिंदे यांच्या गोटात सामील झाले.काल सकाळ पासूनच नॉट रिचेबल असलेले भुसे नेमकी काय भूमिका घेतात याकडे सर्वच शिवसैनिकांचे लक्ष लागून होते.अखेर काल संध्याकाळी दादा भुसे, माजी मंत्री संजय राठोड व रविंद्र फाटक गुवाहाटी येथे जाऊन शिंदे गटात सामील झाले.
मनमाड राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी.
मनमाड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मा.ना.श्री.छगनरावजी भुजबळ साहेब, आमदार...











