शिवसेनेत झालेल्या बंडखोरी नंतर मनमाड शहरातील शिवसैनिकांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ दोन दिवसांपूर्वी बैठक घेऊन व शहरातील प्रमुख चौकात जमून ठाकरेंच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या होत्या. तदनंतर आज छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सकाळी ११ वाजता पक्षप्रमुख ठाकरे यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी रॅली चे आयोजन करण्यात आले असून शहरातील सर्व आजी- माजी पदाधीकारी, लोकप्रतिनिधी, शिवसैनिक कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान ह्या रॅली चे फलक पोलिस प्रशासनाच्या सूचने नुसार मनमाड नगरपरिषदेच्या वतीने काढल्यामुळे शहरात उलटसुलट चर्चेला उधाण आले होते तर काहींनी नाराजी व्यक्त केली.
मनोरुग्ण मुलाचा त्रास असह्य झाल्याने आईनेच दिली हत्येची सुपारी : नांदगाव तालुक्यातील ढेकु येथील घटना
नांदगाव : मनोरुग्ण असलेल्या मुलाचा त्रास असह्य झाल्याने आईनेच पोटच्या मुलाची पंधरा हजार रुपयांची...









