loader image
[ays_poll id=7]

शिंदे समर्थक आमदार घेणार बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन!

Jun 30, 2022


शिवसेनेच्या बंडखोर गटाचे नेते एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली असून शिवसेनेचे बंडखोर आमदार आज गुरुवारी ३० जून रोजी परतल्यावर शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला भेट देणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले. बंडखोर आमदार सकाळी मुंबईत दाखल होणार असून त्यानंतर बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाणार असल्याचे म्हटले. त्यामुळे शिवसैनिक आणि बंडखोर आमदारांचे समर्थक आमनेसामने येण्याची शक्यता आहे.

शिवसेना बंडखोर आमदारांनी काल कामाख्या मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी म्हटले. आमच्याकडे दोन तृतीयांश आमदार असून कोणावरही बळजबरी केली नसल्याचे म्हटले आहे. इथे असलेले आमदार मोकळ्यापणाने वावरत असल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही सगळे शिवसेनेमध्ये असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. बहुमताचा आकडा आमच्या बाजूने असल्याचा दावा त्यांनी केला. आमच्याकडे दोन तृतीयांश आमदार आहेत. कोणत्याही आमदारावर जबरदस्ती केली नाही असे शिंदे यांनी म्हटले. आपल्या देशात बहुमताला महत्त्व आहे. ते बहुमत आमच्याकडे असल्याचे त्यांनी म्हटले. महाराष्ट्राला विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी आणि बाळासाहेबांचे हिंदुत्व जोपासण्यासाठी आम्ही हे पाऊल उचलले असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

शिवसेना प्रमुख दिवगंत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला भेट देणार असून त्यांना मानवंदना देणार आहोत. त्याशिवाय, धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृतीस्थळीदेखील आम्ही आमदार जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांनादेखील वंदन करणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

सुरतमार्गे गुवाहाटीमध्ये दाखल झालेले शिंदे गटाचे आमदार आज पहिल्यांदाच हॉटेल रॅडिसन बाहेर पडले.शिंदे गटाच्या आमदारांनी कडेकोट बंदोबस्तात कामाख्या देवीचे दर्शन घेतले. हे बंडखोर आमदार बुधवारी गोव्यात दाखल होणार आहेत. बहुमत चाचणीसाठी गुरुवारी मुंबईत दाखल होणार आहेत.


अजून बातम्या वाचा..

ग्रंथालयांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

ग्रंथालयांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

  पुणे - जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ग्रंथालयांना अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी, शासन प्रयत्न...

read more
आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर साईराज राजेश परदेशी यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार जाहीर

आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर साईराज राजेश परदेशी यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार जाहीर

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धांमध्ये सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मनमाड...

read more
मनमाड येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध.

मनमाड येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध.

मनमाड, दि. २५ एप्रिल २०२५: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा...

read more
पहलगाम घटनेचा मनमाड क्रिकेट प्रीमियर लीग च्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला

पहलगाम घटनेचा मनमाड क्रिकेट प्रीमियर लीग च्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला

दिनांक २२/०४/२०२५ रोजी जम्मू काश्मीर राज्यातील पहलगाममधिल बैसरण येथे विदेश.देशभरातिल राज्यातून...

read more
.