loader image
[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयात राष्ट्रीय डॉक्टर्स डे साजरा

Jul 1, 2022


म.गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड व विशाखा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने नॅशनल डॉक्टर्स डे या दिवसाचे औचित्य साधून महाविद्यालयात मा. प्राचार्य डॉ.अरुण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नॅशनल डॉक्टर्स डे साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून मनमाड चे सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ. शांताराम कातकाडे, शल्यचिकित्सक डॉ सागर कोल्हे होते. डॉ शांताराम कातकडे यांनी आपल्या व्याख्यानात दरवर्षी डॉक्टरांच्या सन्मानार्थ 1 जुलै या दिवशी नॅशनल डॉक्टर्स डे (National Doctor’s Day) साजरा केला जातो. भारतामधील प्रसिद्ध डॉक्टर डॉ. बिधान चंद्र रॉय (Dr. B.C. Roy) यांच्या सन्मानार्थ आणि त्यांना श्रद्दांजली म्हणून त्यांच्या जयंती आणि पुण्यतिथी म्हणजे 1 जुलै दिवशी नॅशनल डॉक्टर्स डे साजरा केला जातो. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीप्रमाणे करिअर निवडले पाहिजे व विद्यार्थी आपल्या पूर्ण क्षमतेचा वापर करून जास्तीत जास्त मेहनत करून यश मिळविले पाहिजे असे प्रतिपादन केले. डॉ.सागर कोल्हे यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांनी आपल्या शारीरिक आरोग्याची काळजी घेतली पाहिजे शारीरिक आरोग्य चांगले राहिले तर मानसिक आरोग्य देखील चांगले राहते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अरुण पाटील यांनी आपल्या मनोगतातून डॉक्टरांविषयी गौरव उद्गार काढले.डॉक्टरांप्रती सजामामध्ये नितांत आदर आहे. कोरोना व्हायरस संकट काळात तर डॉक्टरांचे महत्त्व अधोरेखित झाले. डॉक्टरांनी देखील जीवाची बाजी लावून या लढ्यात काम केले. त्यामुळे त्यांचे आभार मानावे तितके थोडेच. अशाच या डॉक्टरांसाठी एक दिवस समर्पित करण्यात आला आहे. तो म्हणजे डॉक्टर्स डे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा वर्षा राणी पेडेकर, पाहुण्यांच्या परिचय कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य ज्योती पालवे (बोडके), कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला तक्रार निवारण समिती अध्यक्ष प्रा. कविता काखंडकी मॅडम यांनी केले. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे कुलसचिव श्री समाधान केदारे,महाविद्यालयातील प्राध्यापक प्रशासकिय कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी...

read more
नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

    मनमाड येथे *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या वाढदिवसानिमित्त *आमदार...

read more
*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

  *मनमाड* महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे...

read more
तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुन्हा एकदा मनमाडच्या खेळाडूंचा डंका तळेगाव दाभाडे पुणे येथे 23...

read more
.